Pune News : तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  प्राणघात हल्ला केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या स्वारगेट पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या मागावर पोलीस होते. मात्र, आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर आरोपीला एकोपा गार्डन येथे सापळा रचून अटक करण्यात आली. सिकंदर उर्फ चिकु समद्दीन शेख (वय-31 रा. यायसप्लॉट, गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सिकंदर शेख याच्यावर 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी शेख हा एकोपा गार्डन येते येणार असल्याच माहिती पोलीस शिपाई सोमनाथ कांबळे, संदीप साळवे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचुन आरोपी सिकंदर उर्फ चिकु शेख याला अटक केली.

ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस हवालदार सचिन कदम, विजय कुंभार, विजय खोमणे, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे,लखन ढावरे, सचिन दळवी, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, वैभव शीतकाल, शंकर गायकवाड, ऋषिकेश तिटमे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.