धक्कादायक ! महिलेला चक्क विविध प्रकारचे ‘अंतर्वस्त्र’ पाठवणारा ‘तो’ ‘महाशय’ गोव्यात आला ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ३३ वर्षीय महिलेला अंतर्वस्त्र भेट म्हणून पाठवणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीला गोव्यातून अटक केली. आरोपीने यापूर्वीही महिलेला अश्लील मेसेज आणि व्हाइस रेकाॅर्डिंग पाठवल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.

तीन पॅन्टीस्‌ फक्‍त तुझ्यासाठी…

मरीन ड्राइव्ह परिसरात राहणाऱ्या महिलेला १५ जूनला राहत्या घरी पोस्टाने एक पार्सल आलं होतं. ते पार्सल उघडल्यानंतर महिलेला त्यात तीन पँट व एक चिट्टी मिळाली. त्यात “तीन पॅन्टीस्‌ फक्‍त तुझ्यासाठी… मला विश्‍वास आहे तुला आवडतील…प्लीज त्या घाल…”असा अश्‍लील संदेश लिहिला होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने पोस्टात चौकशी केली असता ते काळबादेवी येथून आल्याचं निष्पन्न झालं. महिलेने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे जून महिन्यात तक्रार केली होती. पोस्टाकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी प्रदोष रामकृष्ण नाईक याला गोव्यातील फोंडा परिसरातून अटक करण्यात आली. तपासात आरोपीचे नाव पुढे आल्यानंतर वर्षभरापासून महिलेला त्रास देणारा हाच असल्याचं निष्पन्न झालं.

जामीन अर्ज फेटाळला

आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोव्यातील वास्को येथील कामाच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी अंती त्याला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शनिवारी अटक केली. चौकशीत आरोपीने महिलेला वास्को येथील टपाल कार्यालयासह मुंबईतील जीपीओ येथूनही अंतरवस्त्र पाठवल्याचं निष्पन्न झालं आहे.

आरोग्यविषयक वृत्त