‘त्या’ नराधमाने पेट्राल टाकून बापासह तीन वर्षांच्या चिमुरडीला जाळले 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथील लक्ष्मण बडगुजर (३८) हे सतत दारूच्या नशेत असल्याकारणाने त्यांची पत्नी तिच्या बहिणीकडे निघून गेल्याने तिला गावी हिम्मत बडगुजर यांनीच पाठविल्याचा संशयावरून त्यांच्या तीन वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना घडली.

शिरसोदे येथील लक्ष्मण भिमराव बडगुजर हे सतत दारूच्या नशेत असायचे ते रोजच दारूच्या नशेत असल्याने वादविवाद सुरू असायचे त्याला कंटाळून त्यांची पत्नी तिच्या बहिणीकडे मुकटी (ता. जि. धुळे ) येथे निघून गेल्याने त्याचा राग अनावर होऊन मनात क्रोध निर्माण झाला होता. त्यातच हिम्मत उखडू बडगुजर यानेच पत्नीला बहिणीकडे पाठविल्याच्या संशयावरून त्याने शालकचे घर गाठत हिम्मत बडगुजर हे त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीसह आपल्या घराच्या ओट्याचा पायथ्याशी बसले होते. तिथे लक्ष्मण बडगुजर याने येत त्यांच्या हातातील पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून आग लावून त्यात तीन वर्षांची मुलगी गुंजन हिम्मत बडगुजर ही २३ टक्के भाजली असून वडीलही किरकोळ जखमी झाले आहेत.

या घटनेने गावात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसात हिम्मत उखल्लू बडगुजर यांच्या फिर्यादीवरून ३०७,५०४,५०६ कलमन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे करीत आहेत.