‘कोरोना’पासून वाचण्यासाठी ‘होमियोपॅथी’ला मिळालं मोठं यश,महिन्यातून केवळ 6 दिवस घ्यायचं औषध

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसशी लढ्यासाठी वॅक्सीन तयार करण्यात गुंतले आहे. भारत सुद्धा यामध्ये आहे, परंतु यासोबतच आता भारतात होमियोपॅथीचा सुद्धा या लढाईत वापर केला जात आहे. होमियोपॅथीच्या मदतीने लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासह ती मजबूत केली जात आहे, ज्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना ठिक केले जाऊ शकते, तसेच नवीन रूग्णसुद्धा समोर येणे कमी झाले आहे.

डॉ. जवाहर शाह मागच्या 40 वर्षांपासून मुंबईत होमियोपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. डॉ. शाह यांनी जगभरात पसरलेल्या सुमारे 100 होमियोपॅथी डॉक्टर्ससोबत मिळून एक खास सेट ऑफ मेडिसिन (सीके 1 आणि सीके 2) तयार केले आहे. हे औषध माणसाच्या शरीरात इम्युनिटी वाढवते, ज्यामुळे कोणताही आजार तुमच्या जवळ येत नाही.

औषधाचे हे पूर्ण किट 22000 पोलीस, 4000 फायर ब्रिगेडचे मेंबर, धारावीत राहणारे 2000 लोकांसह आतापर्यंत एकुण 1 लाखपेक्षा जास्त लोकांना देण्यात आले आहे. हे औषध सायको न्यूरो एन्डॉसरीनवर परिणाम करते. हे औषध आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांच्या आधारेच तयार केले आहे.

आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित आर्सेनिक एल्गम आणि कॅम्फर एम 1 या औषधांना समाविष्ठ केले आहे, ज्याची मागणी सध्या परदेशात सुद्धा होत आहे. या औषधाची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, हे महिन्यात केवळ एक वेळच घ्यायचे आहे, ज्याचा कोर्स 6 दिवसांचा आहे. प्रथम सीके 1 औषध लागोपाठ तीन दिवस घ्यायचे आहे. हे दिवसातून तीन वेळा घ्यायचे आहे. यानंतर सीके 2 चा वापर सुद्धा लागोपाठ तीन दिवस करायचा आहे. हे सुद्धा दिवसातून तीन वेळा घ्यायचे आहे. अशाप्रकारे एक महीन्यात या औषधाचा कोर्स 6 दिवसांचा आहे.

डॉ. शाह यांचा दावा आहे की, आता मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात आहेत, तेव्हा त्यांना हे औषध देण्यात यावे. यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होईल. या औषधाचा खर्च सुद्धा 15 ते 20 रुपयांपेक्षा जास्त नाही.

डॉ. शाह यांच्यानुसार भारतात अशा लोकांची संख्या भरपूर आहे ज्यांच्यामध्ये कोणतेही लक्षण दिसत नाही, परंतु ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच कोरोना व्हायरसने मरणार्‍यांचा आकडाही कमी आहे. लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध महत्वाचे आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आयुष मंत्रालयाच्या आदेशावरच आयुर्वेद आणि होमियोपॅथीशी संबंधित डॉक्टर सेवा करत आहेत, ज्यासाठी आम्ही अशा सुमारे 10 डॉक्टर्सचा एक टास्क फोर्स बनवला आहे. आम्हाला हे देखील समजले आहे की, होमियोपॅथीने आम्हाला चांगला रिझल्ट मिळत आहे.

डॉ. शाह त्या टास्क फोर्सचे सुद्धा मेंबर आहेत, जो महाराष्ट्र सरकारने कोरोनो व्हायरसशी लढण्यासाठी आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी डॉक्टर्स एकत्र आणून बनवला आहे. ज्या लोकांमध्ये लक्षणे नाहीत, परंतु ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांना कॉलवरच डेली कन्सल्टन्सी द्यायची, हे या टास्क फोर्सचे काम आहे. तसेच ज्या लोकांमध्ये लक्षणे आहेत, परंतु ते कोरोना पॉझिटिव्ह नाहीत, त्यांनाही कॉलवरच कन्सल्टन्सीने उपचार दिला जाईल. यामुळे राज्याच्या हेल्थ सिस्टमवरील प्रेशर कमी होईल. भारतात सर्वात जास्त होमियोपॅथी कॉलेज आणि सर्वात जास्त डॉक्टर प्रॅक्टिस करतात. तर परदेशात एका औषधाचे 25 ते 30 डॉलर वसूल केले जातात, भारतात याची किंमत खुप कमी आहे. यासाठी भारतात आता कोरोनाच्या लढाईत अनेक वर्षे जुन्या उपचारपद्धतीचा वापर केला जात आहे.