Acid Reflux | जेवल्यानंतर छातीत जळजळ होते का? अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये ‘या’ 10 पद्धती देतील आराम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अ‍ॅसिड रिफ्लक्सची (Acid Reflux) समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा पोटातील अ‍ॅसिड अन्ननलिका किंवा घशाच्या दिशेने जाते. त्यामुळे छातीत आणि घशात जळजळ जाणवते. अमेरिकेत 15 पैकी एका व्यक्तीमध्ये अ‍ॅसिड रिफ्लक्स (Acid Reflux) खूप सामान्य आहे. यातून दिलासा मिळवण्यासाठी अनेकजण पाण्यासारखा पैसा खर्च करतात. पण जीवनशैलीतील सहज बदल (Lifestyle Changes) आणि घरगुती उपायांनीही (Home Remedies) यावर मात करता येऊ शकते, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे.

 

झोपताना कसे असावे बॉडी पोश्चर (Body Posture While Sleeping) ?
अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे अनेकदा रात्री जास्त अस्वस्थता येते. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा पोटातून घशात अ‍ॅसिड रिफ्लक्सचा प्रवाह सुलभ होतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या झोपण्याच्या पद्धतीकडेही लक्ष दिले पाहिजे.

 

2011 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, आठवड्यातून डोक्याच्या बाजूला बेड 8 इंच वर करून झोपलेल्या लोकांच्या छातीत जळजळ आणि झोपेच्या समस्यांमध्ये सुधारणा झाली आहे.

 

डायग्लिसायरिझिनेटेड लिकोरिस (DGL) –
लिकोरिस (Liquorice) ही एक औषधी वनस्पती आहे जी पोटाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी बर्‍याच काळापासून वापरली जाते. डीजीएल हे लिकोरिसचे सुधारित रूप आहे ज्यामध्ये ग्लायसिरीझिन संयुग काढून टाकले जाते, कारण ते रक्तदाब वाढवू शकते.

 

डीजीएल अन्ननलिकेतील जळजळ होण्याची समस्या कमी करून अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये आराम देते. याशिवाय आले, कॅमोमाइल आणि मार्शमॅलो (Chamomile And Marshmallow) या औषधी वनस्पतींचाही अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये फायदा होतो.

 

थोडे-थोडे खा (Eat Little By Little)
एकाच वेळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाला अन्ननलिकेपासून वेगळे करणार्‍या स्फिंक्टरवर दाब वाढतो. यामुळे स्फिंक्टर उघडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आणि अ‍ॅसिड रिफ्लक्सचा प्रवाह वरच्या दिशेने वाढू लागतो. त्यामुळे एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी कमी प्रमाणात खा. उदाहरणार्थ, तीन वेळा खाण्यापेक्षा पाच वेळा कमी प्रमाणात खाणे चांगले. (Acid Reflux)

कॉफीवर नियंत्रण ठेवा (Take Control Of Coffee)
जर तुम्हाला कॉफी प्यायला आवडत असेल तर लवकरात लवकर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कॉफी हे फक्त आम्लयुक्त पेय नाही तर ते प्यायल्यानंतर तुमच्या पोटात जास्त अ‍ॅसिड तयार होते जे नंतर तुमच्या घशात जाते. आपले लोअर एसोफॅगल स्फिंक्टर (Lower Esophageal Sphincter) देखील कॅफीनमुळे सुस्त होते, ज्यामुळे पोटात साठलेले अ‍ॅसिड वरच्या दिशेने जाऊ लागते.

 

या गोष्टी टाळा (Avoid These Things) –
काही खाद्यपदार्थ अ‍ॅसिड रिफ्लक्सला चालना देण्यासाठी कार्य करतात. म्हणून, आपण अशा गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत ज्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते. चीज, तळलेले अन्न, चिप्ससारखे प्रक्रिया केलेले अन्न, खारवून वाळवलेले मांस, चॉकलेट, मिरची पावडर आणि पिझ्झासारखे पदार्थ काटेकोरपणे टाळा.

 

कोणत्या गोष्टी खाव्यात (What Should Be Eaten) ?
अ‍ॅसिडिक गोष्टींऐवजी, क्षारीय पदार्थ खा जे रिफ्लक टाळण्यासाठी कार्य करू शकतात. उच्च पीएच पातळी असलेल्या गोष्टींमध्ये अल्काईन जास्ते असते. यामध्ये फुलकोबी, बडीशेप आणि केळी यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

 

जास्त फायबर (More Fiber)
2018 मध्ये केलेल्या एका लहानशा अभ्यासानुसार, नॉन-इरोसिव्ह अ‍ॅसिड रिफ्लक्स (Non-erosive Acid Reflux) आजार असलेल्या लोकांमध्ये ज्यांनी फार कमी फायबर घेतले होते त्यांना सायलियम फायबर सप्लिमेंट्स घेतल्यानंतर अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता कमी होती. फायबरमुळे आपली भूक बराच काळ कमी होऊ शकते, त्यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्स ट्रिगर होण्याची शक्यता देखील कमी होते.

 

जेवल्यानंतर काय करावे (What To Do After Eating)
जेवल्यानंतर सुमारे तीन तास उभे राहिल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या संपुष्टात येते.
याचा अर्थ असा की जर तुम्ही झोपण्याच्या काही तास आधी रात्रीचे जेवण केले तर तुम्हाला चालायला किंवा उभे राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती आम्लाला पोटातून वर जाऊ देत नाही.

डाव्या कुशीवर झोपावे (Lie On The Left Side)
डाव्या कुशीवर झोपल्यानेही अ‍ॅसिड रिफ्लक्स टाळता येतो. 2015 मध्ये केलेल्या एका लहानशा अभ्यासानुसार,
जे लोक डाव्या कुशीवर झोपतात त्यांच्यामध्ये अ‍ॅसिड रिफ्लक्स कमी दिसून येते.

 

2006 मधील अनेक अभ्यासांचे विश्लेषण असे सूचित करते की जे लोक त्यांच्या उजव्या बाजूला झोपतात त्यांना अ‍ॅसिड रिफ्लक्स होण्याची
अधिक शक्यता असते. मात्र शास्त्रज्ञ अद्याप त्यामागील कारणे ओळखू शकलेले नाहीत.

 

एलोवेरा ज्यूस (Aloe Vera Juice) –
काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की कोरफड ज्यूस सेवन केल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये देखील आराम मिळतो.
2015 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज सुमारे 10 मिली एलोवेरा ज्यूस प्यायल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये आराम मिळतो.
ही कृती औषधांपेक्षा अधिक प्रभावी मानली जाते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Acid Reflux | 10 home remedies of acid reflux and get rid of heartburn

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

 

Body Hydration Tips | ‘या’ ऋतूमध्ये शरीराच्या हायड्रेशनवर विशेष लक्ष ठेवा, ‘या’ गोष्टींचं सेवन फायदेशीर; जाणून घ्या

 

Diabetes | मधुमेहींनी ‘या’ गोष्टींचं सेवन चुकून देखील करू नये, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं; जाणून घ्या