पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून ACP सुषमा चव्हाण, सर्जेराव बाबर यांच्या अंतर्गत बदल्या, महिला एसीपीला जागतिक दिनाचं ‘गिफ्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महिला सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांची स्वारगेट सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर सहाय्यक आयुक्त सर्जेराव बाबर यांची वाहतूक शाखेत बदली केली आहे. पोलीस आयुक्तांच्या सरप्राईज गिफ्टने चव्हाण यांनी आज सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत पदभार घेतला.

आज जागतिक महिला दिन आहे. महिलांच्या कार्याला या दिवशी गौरविण्यात येत. तर वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी देखील दिली जाते. त्यानिमित्ताने आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे सरप्राईज गिफ्ट दिले आहे. नुकताच सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील तसेच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर तसेच स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महिला दिन आहे. त्यानिमित्ताने पोलीस आयुक्त यांनी विश्वास दाखवत आज स्वारगेट सहायक आयुक्त म्हणून कार्यभार दिला आहे. तो विश्वास मी सार्थ करून दाखवेल, असे यावेळी सुषमा चव्हाण यांनी सांगितले.