DYSP सुधीर खिरडकर आणि PI प्रशांत महाजन यांना का वाचवलं जातंय?

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात झालेल्या वादाची व्हिडीओ शुटींग काढण्याच्या कारणावरुन भारतीय युवा मोर्चाच्या सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्थरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली. अखेर शुक्रवारी (दि.28) एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांना निलंबित करण्यात आले. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक (PI) प्रशांत महाजन यांच्यावर कारवाई केली नसल्याने त्यांना का वाचवले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जालना शहरातील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात दोन लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात अडकलेले जालन्याचे डिवायएसपी सुधीर खिरडकर व त्यांच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करत असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांनी पदाधिकाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. डीवायएसपी खिरडकर यांच्यासह कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी देखील मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी एका पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस शिपायांना निलंबित केले.
ज्यांच्या आदेशावरून जालन्यात युवकाला निघृणपणे मारहाण झाली ते DYSP खिरडकर आणि पोलीसनिरीक्षक महाजन यांना निलंबीत न करता शिपाई आणि फौजदाराचं निलंबन केलं गेलं
ज्यांच्या आदेशावर युवकाला मारहाण झाली त्यांना का वाचवलं जातयं
तात्काळ निलंबीत करा@maharashtra_hmo @DGPMaharashtra @sp_jalna— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 29, 2021
या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. शिवराज नारीयलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणातील दोषींवर कठरोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअर ही केले. तसेच इतरही भाजप नेत्यांनी कारवाईची मागणी केली होती.
पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन केवळ शिपायांचं निलंबन केलंय. पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपी खिरडकर यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्या आदेशावरुन मारहाण झाली त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला का वाचवलं जातंय, असाही सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR
वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय