अजयच्या नव्या चित्रपटाचा पहिला लुक रिलीज 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता अजय देवगण याच्या तानाजी या चित्रपटाचा पहिला लुक रिलीज झाल्याचे समोर आले आहे. अजयच्या तानाजी या बायोपिकचा पहिला लुक जाहीर समोर आणत अजय देवगनने नववर्षाच्‍या सुरुवातीलाच आपल्‍या चाहत्‍यांना एक ग्रेट गिफ्‍ट दिले आहे. २०१७ मध्‍येच अभिनेता अजय देवगनने चित्रपट ‘तानाजी‘ ची घोषणा केली होती त्यासोबत एक पोस्टरदेखील रिलीज केलं होतं.

तानाजी हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन ओम राऊत करत आहेत. ‘तानाजी’ हा चित्रपट मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांचा बायोपिक आहे. ‘तानाजी’ चित्रपटातून अजय देवगन आणि काजोल तब्‍बल ८ वर्षांनंतर एकत्र मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्‍ये दसरा किंवा दिवाळीत रिलीज होईल, असे म्‍हटले जात आहे.

‘तानाजी’मध्‍ये अजय देवगन मुख्य भूमिकेत आहे. तानाजी चित्रपटाचे शूटिंग २५ सप्‍टेंबरपासून सुरू करण्‍यात आले होते. सूत्रांच्‍या माहितीनुसार, सलमान खान कॅमियो रोलमध्‍ये दिसणार आहे. परंतु, या भूमिकेसाठी सलमान खानकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

चित्रपट ३ डी मध्‍ये येणार ?
रिपोर्टनुसार, अजय देवगन हा बायोपिक 3D मध्‍ये आणणार आहे. तसे झाल्‍यास अजय देवगनचा हा पहिला 3D चित्रपट असेल.