अभिनेता भरत जाधवने ‘या’ कारणासाठी केला व्हिडिओ ‘व्हायरल’ (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता भरत जाधव याने एक व्हिडिओ आपल्या फेसबुकवर टाकला असून त्यात तो बनियनवर दिसतो आहे. सुरुवातीला आपल्याला वाटेल हे काय प्रकरण आहे. मात्र, हे काही प्रकरण नसून ठाण्यातील काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहात त्याचा प्रयोग सुरु असताना काय परिस्थितीला सामोरे जावे लागत. हे दाखविण्यासाठी त्याने हा व्हिडिओ टाकला आहे.

‘भाडं पूर्ण घेतात परंतु, सुविधांच्या नावाने बोंब, कधी सुधारणार’ असा प्रश्न विचारत भरत जाधव यांनी हा व्हिडिओ टाकला आहे.

ठाण्यातील काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहात त्यांचा प्रयोग सुरु असताना एसी पूर्णपणे बंद होता. त्यामुळे सर्व कलाकार घामाघुम झाले. त्याच स्थितीत त्यांना प्रयोग करावा लागला. त्याचा कलाकारांना भयंकर त्रास झाला. बऱ्याच वेळा सांगूनही ए सी सुरु न झाल्याने शेवटी आपले म्हणणे सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी आपला बनियनवरील घामाघुम झालेला व्हिडिओ फेसबुकवर टाकला आहे.

या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर नेटीजन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी त्यांना राज ठाकरे यांच्याशी संपर्क करा, सगळे सरळ होतील, असा सल्ला ही दिला आहे.

लिंकवर क्लिक करुन व्हिडीओ पाहा –

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2194892407286836&id=100002982939293

आरोग्यविषयक वृत्त-

Loading...
You might also like