दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – बॉलीवूडचे दिग्गज कलावंत आणि ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे अभिनय सम्राट दिलीपकुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन ( actor Dilip Kumar passes away) झाले. आजारपणामुळे त्यांच्यावर खार हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचार करण्यात येत होते. बुधवारी सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीपकुमार यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडून गेला आहे. दिलीपकुमार (actor Dilip Kumar ) यांना गेल्या महिन्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल केले होते. 5 जुलैला त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट देण्यात आली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

11 डिसेंबर 1922 ला आताच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे दिलीपकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मुळ नाव मोहम्मद युसुफ खान होते. त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. राजकपूरशी त्यांची लहानपणापासून दोस्ती झाली होती. तेथूनच दिलीपकुमार यांचा बॉलीवूड प्रवास सुरु झाला. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांना पहिली फिल्म मिळाली. 1944 साली त्यांनी ज्वार भाटा या चित्रपटात काम केले होते.

दिलीप कुमार यांनी आपल्या पाच दशकाच्या कारकिर्दीत जवळपास 60 चित्रपट केले. दिलीप कुमार यांनी 1966 साली सायरा बानो त्यांच्याशी विवाह केला. त्यावेळी सायरा बानो याही एक अभिनेत्री होत्या. त्या दिलीपकुमार यांच्यापेक्षा 22 वर्ष लहान होत्या. सायरा बानो यांनी त्यांना शेवटच्या श्वासपर्यंत साथ दिली.
दिलीपकुमार यांनी 1998 मध्ये ‘किला’ हा शेवटचा चित्रपट केला.

शहीद, मेला, नदिया केपार, बाबुल, फुटपाथ, देवदास, नया दौर, मुगले -ए – आजम, गंगा जमुना, राम और श्याम, कर्मा असे अनेक चित्रपट गाजले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिजात बादशहा, ट्रेजेटी किंग म्हणून दिलीपकुमार ओळखले जातात. त्यांच्या अभिनय समोर ठेवून अनेकांनी त्यांच्याप्रमाणे संवादफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यांची स्वत:ची अशी एक स्टाईल होती. त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या शेकडो अभिनेत्यांनी केला. त्यातून अनेकांची कारकिर्दी यशस्वी ठरली आहे. असा हा शतकाचा अभिनय सम्राट आज काळाच्या पदड्याआड गेला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : BREAKING | Legendary actor Dilip Kumar passes away, Breathed last at Hinduja Hospital

 

हे देखील वाचा

 

Modi Cabinet Expansion | PM मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द, मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार; महाराष्ट्रातून ‘या’ नेत्यांची नावं

Bibwewadi Police | चौघींसोबत झेंगाट अन् 53 जणींसोबत लग्नाची बोलणी करत 53 लाखांना गंडा, पोलिसांकडून भामट्याला अटक; जाणून घ्या प्रकरण

Nana Patole । नाना पटोलेंचे विधानसभेत गंभीर आरोप; म्हणाले – ‘माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान’