अभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत जाऊन घेतली अमित शाहांची भेट, 20 मिनीट चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या महाराष्ट्रात ‘नाम’ फाऊंडेशन मार्फत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक कामे करणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी केंदीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पाटेकर यांनी दिल्लीच्या गृहमंत्रालयाच्या कार्यलयात जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये २० मिनिटांची चर्चाही झाली.

राज्यात काही दिवसातच विधानसभेची निवडणूक सुरु होणार आहे. त्याबाबतची राज्यातील अनेक पक्षांची तयारी सुरु झालेली आहे. त्यामुळे नानांनी अमित शहा यांची भेट नेमकी का घेतली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र दोघांमध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते, या भेटीकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे. नाना पाटेकर यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उघडपणे स्तुती केली होती.

नाना पाटेकर मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘नाम’ फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये मोठया प्रमाणावर काम करत आहेत तसेच कोल्हापूर सांगली येथील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कामही नाना सध्या करणार आहेत त्यामुळे नेमकं या भेटी मागील कारण अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like