‘या’ अभिनेत्याने पैसे घेऊन राहूल गांधी यांची घेतली मुलाखत

वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये युवकांशी संवाद साधला होता. तेव्हा अभिनेता सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची चांगलीच चर्चा झाली होती. सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळे भावे यांनी राहुल गांधी यांची मुलाखत घेतल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. आता त्या मुलाखत संबंधी सुबोध भावे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राहुल गांधी यांची मुलाखत घेण्यासाठी मी पैसे घेतले असून हा माझा व्यवसाय आहे. मी एक शिवसैनिक आहे. असे मत सुबोध भावे यांनी व्यक्त केले आहे.

सुबोध भावे म्हणाला की, राजकीय व्यक्तिमत्व म्हणून मी राहुल गांधी यांचा आदर करतो. सोशल मीडियावरून त्याच्याबद्दल काहीही बोलले जाते. पण सोशल मीडियावरील सगळेच काही खरे नसते. २०१४ ते २०१९ या गेल्या पाच वर्षात राहुल गांधी यांच्यात बदल झाला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षातही त्यांच्यात बदल होऊ शकतो.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानाआधी राहुल गांधी यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. काँग्रेसच्या व्यासपीठार जाण्यासाठी मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली होती, असा खुलासा देखील सुबोध भावे यांनी केला आहे. ही मुलाखत घेत असताना सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांस गंमतीने मी तुमचा बायोपिक करत असल्याचे म्हंटले होते. यावरून सुबोध भावे आता राहुल गांधी यांचा बायोपिक करणार अशी चर्चा समाज माध्यमांत रंगली होती.