जेव्हा आईसोबत अफेअरच्या चर्चांनी वैतागला होता राहुल रॉय !

पोलीसनामा ऑनलाइन – 1990 आलेल्या म्युझिकल ब्लॉकबस्टर सिनेमा आशिकी (1990 Blockbuster Movie Aashiqui) मधील बॉलिवूड अ‍ॅक्टर राहुल रॉय (Rahul Roy) ब्रेन स्ट्रोकनंतर आता मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

राहुल त्याचा आगामी सिनेमा एलएसी – लिव द बॅटल (Lac The Live Battle) ची शूटिंग करताना कारगिलमध्ये त्याला ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर त्याला मुंबईत परत आणलं गेलं आणि नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जेव्हा उडाल्या होत्या आईसोबत अफेअरच्या चर्चा

राहुलनं एका मुलाखतीत एक विचित्र घटना सांगितली होती. राहुलनं सांगितलं होतं की, तो एकदा मित्रांसोबत तो पार्टीसाठी एका हॉटेलवर गेला होता. तिथं त्याची आईदेखील फ्रेंड्ससोबत आली होती. यावेळी राहुल सोबत आईनं डान्स करण्यासाठी विचारलं. दुसऱ्या दिवशी असं छापून आलं की, राहुल एका वृद्ध महिलेसोबत नात्यात आहे आणि तिच्या सोबत तो डान्स करताना दिसला आहे. राहुल नाराजी व्यक्त करत म्हणाला की, लोकांनी किमान हे तरी कन्फर्म करायचं होतं की, ती महिला कोण आहे.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर आशिकी या सिनेमानंतर त्यानं प्यार का साया, बारिश, जुनून, गजब तमाशा, दिलवाले कभी ना हारे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय फिर तेरी कहानी याद आई, सपने साजन के, नसीब असेही त्याचे काही सिनेमे सांगता येतील. त्यानं टीव्ही शोजदेखील केले आहेत. 2006 साली आलेल्या बिग बॉसच्या पहिल्या सीजनचा तो विनर आहे.

You might also like