Actor Shah Rukh Khan | किंग खानच्या दोन्ही चित्रपटांनी प्रदर्शनापूर्वीच कमावला 500 कोटींचा गल्ला

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा सुपरस्टार किंग खान अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) हा त्यांच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवरुन चर्चेत असतो. त्याचा याच वर्षी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोबत ‘पठान’ चित्रपट रिलीज झाला होता. (Pathan Movie) या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. (Pathan Box Office Collection) अभिनेता शाहरुखच्या आगामी चित्रपटांनी रिलीज पूर्वीच करोडो रुपयांची कमाई केली आहे. शाहरुखचा (Actor Shah Rukh Khan) चाहता वर्ग त्यांच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत असतो, त्याचे बहुचर्चित ‘जवान’ (Jawan Movie) व ‘डंकी’ हे सिनेमे रिलीज होण्याआधीच करोडो रुपये कमावत आहेत.

किंग खान शाहरुख खानचे लवकरच डंकी (Dunki Movie) व जवान हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यातील जवान चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झालेले असून काही डिझायनिंगच्या गोष्टी बाकी आहेत. या दोन्ही चित्रपटांचे अद्याप टीझर देखील रिलीज झाले नसून प्रेक्षकांना दोन्ही चित्रपटांच्या कहानीबद्दल काहीच कल्पना देण्यात आलेली नाही. शाहरुखच्या या बहुचर्चित चित्रपटामधील ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने (Director Atlee Kumar) केले असून ‘डंकी’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Director Rajkumar Hirani) यांनी केले आहे. या दोन्ही सिनेमांनी आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार ‘जवान’ व ‘डंकी’ या दोन चित्रपटांचे सॅटेलाइट, डिजिटल आणि म्यूझिकल राइट्स विकण्यात आले आहे. ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमांचे राइट्स वैरिड प्येयर (varied Players) यांनी विकत घेतले असून हा सिनेमांचा व्यवहार 450-500 कोटींच्या घरात आहे. ‘जवान’ या सिनेमाचे राइट्स 250 कोटी आणि ‘डंकी’चे राइट्स 230 कोटींमध्ये विकले गेले आहेत. (SRK Upcoming Movie) शाहरुखच्या या दोन्ही चित्रपटांची निर्मिती किंग खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेन्टच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. जवानच्या पोस्टरवर गौरी खानचे (Gauri Khan) नाव झळकत आहे. ‘जवान’ या सिनेमाचे सर्व भाषांमधील राइट्स विकले गेले आहेत. तर ‘डंकी’ या सिनेमाचे फक्त हिंदी भाषेतील राइट्स विकले गेले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी मिळून रिलीज आधीच 500 कोटींची कमाई केली आहे.

अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग जगभर असून त्याचे चाहते शाहरुखच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा करत असतात. त्याचे आगामी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचा जवान हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Jawan Movie Release date) तो हिंदी, तेलुगु व तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये किंग खान (Actor Shah Rukh Khan) डबल रोल करताना दिसणार आहे. तर ‘डंकी’ हा चित्रपट याच वर्षी नाताळ पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना शाहरुखच्या दोन्ही चित्रपटांची आतुरता लागली आहे.

Web Title :  Actor Shah Rukh Khan | shah rukh khan jawan and dunki creates records jawan and dunki non theatrical rights sold for rs 500 crore know srk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांचे श्रमदान, चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार

Maharashtra Political Crisis | ‘शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, कारण…’, भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Political Crisis | शिंदे गटात नाराजी, विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं; बच्चू कडूंनी बोलून दाखवली खदखद