Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांचे श्रमदान, चाँदसैली घाटाने घेतला मोकळा श्वास

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police News | नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व धडगाव या दोन गांवांना जोडणाऱ्या मार्गावरील चाँदसैली हा घाट (Chandsaili Ghat) असून दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून (Landslide) वाहतूक ठप्प (Traffic Jam) होते. दरड कोसळल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने (Nandurbar Police News) श्रमदान करुन 9 ते 10 किलोमीटर घाट रस्ता साफ केला. नंदुरबार पोलीस, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

 

चाँदसैली घाटात जून महिन्यात पावसाळा (Rainy Season) सुरु झाल्यावर मार्गावर दरड कोसळते. त्यामुळे धडगाव तालुक्यातील गावांचा तळोदा तालुक्याशी पर्य़ायाने जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होते. काही वेळेला दरड कोसळल्यामुळे अपघात (Accident) होऊन जिवन हानी देखील होते. तसेच तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे धडगाव ते तळोदा रोडवरील चाँदसैली घाटात दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. (Nandurbar Police News)

 

चाँदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे नागरिकांना तसेच शेतकरी, विद्यार्थी यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांना याची माहिती समजली. सामाजिक बांधीलकीच्या जबाबदारीचा एक भाग म्हणून त्यांनी घाटातील परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेऊन श्रमदान (Shramdaan Activity) करुन रस्ता मोकळा करण्याची संकल्पना मांडली.

 

पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्कलकुवा उप विभागातील व स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch (LCB) पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोठार गावच्या परिसरातील नगारिक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने चाँदसैली घाटात श्रमदान करण्याची योजना आखली. मंगळवारी (दि.4) कोठार दूरक्षेत्र ते चाँदसैली या 9 ते 10 कि.मी. चा घाटरस्ता साफ करण्यात आला.

 

पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe), अक्कलकुवा विभागाचे (Akkalkuwa Division) उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे (Deputy Divisional Police Officer Sadashiv Waghmare) यांच्यासह न्यु हायस्कूल तळोदा येथील स्काउट गाइड (Scout Guide) व एनसीसी (NCC) चे विद्यार्थी, गृह रक्षक दलाचे जवान, कोठार व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व अक्कलकुवा विभागातील 100 पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकूण 150 ते 200 जणांनी श्रमदान केले.

यावेळी चाँदसैली घाटात रस्त्याच्या बाजूला असलेले दगड मुरुम टाकून खड्डे भरणे,
रस्त्यांवर पडलेले दगड, रस्त्यावर कोसळलेली दरड जेसीबीच्या मदतीने बाजूला करणे,
खचलेला रस्ता भराव टाकून दुरुस्त करणे इत्यादी प्रकारचे श्रमदान केले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत: हातात फावडे घेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकली,
रस्त्यावर पडलेले दगड बाजूला केले. पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर आलेले दगड,
मातीचे ढिगारे बाजूला झाल्याने चाँदसैली घाटाने मोकळा श्वास घेतला.

यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीड बँकेतील बिया घाटातील भागात रोवण्यात आल्या.
तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. श्रमदान कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी,
शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याबद्दल पी. आर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

श्रमदानामध्ये पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे,
अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे
(Akkalkuwa Police Station) पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत (Deepak Budhwant),
तळोदा पोलीस ठाण्याचे (Taloda Police Station) पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार
(Rahul Kumar Pawar), मोलगी पोलीस ठाण्याचे (Molgi Police Station)
पोलीस निरीक्षक धनराज निळे (Dhanraj Neele),
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (API Sandeep Patil),
अविनाश केदार (API Avinash Kedar), अमितकुमार बागुल (API Amit Kumar Bagul), धडगाव पोलीस ठाण्याचे (Dhadgaon Police Station) पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील (PSI Rahul Patil) यांनी सहभाग नोंदवला.

 

Web Title : Nandurbar Police News | Thanks to Nandurbar Police, Chandsaili Ghat breathed a sigh of relief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार