Maharashtra Political Crisis | ‘शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, कारण…’, भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी पक्षात बंडखोरी करत आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला (Shiv Sena-BJP Alliance Government) पाठिंबा दिला. या घटनेची चर्चा महाराष्ट्रात आणि देशात सुरु आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यामुळे दोन गट पडले आहेत. आज दोन्ही गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप झाले. (Maharashtra Political Crisis) राज्यात राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे भाजप खासदाराने (BJP MP) ही शक्यता वर्तवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

ADV

 

भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (MP Subramanian Swamy) नेहमीच त्यांच्या ट्विटमधून त्यांची भूमिका मांडत असतात. या भूमिकांमधून ते अनेकदा स्वपक्षाच्याच विरोधात मत मांडताना दिसतात. आज त्यांनी केलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेकांपासून दूर गेले आणि टोकाला जाऊन टीका करणारे शिवसेनेतील शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) पुन्हा एकत्र येणार असल्याची शक्यता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. ही बाब आपल्या कानावर आल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Maharashtra Political Crisis)

 

काय म्हटलं ट्विटमध्ये?

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्यांनी म्हटलं, मी मुंबईत आहे. शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) परत जाऊ शकतात.
कारण मोदींनी (PM Narendra Modi) आधी त्यांचा वापर करुन घेतला आणि नंतर त्यांना बाजूला सारुन
आता राष्ट्रवादी काँग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे या गोष्टीमुळे ते अस्वस्थ झाले आहेत,
असं मी ऐकलं, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Political Crisis | bjp mp subramanian swamy says
shinde faction may return to uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा