Maharashtra Municipal Elections | विरोधकांची ताकद दुभागल्याने ऑक्टोबरमध्ये महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Municipal Elections | राज्यातील सत्तानाट्यामुळे आगामी राजकिय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. राज्यातील शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) या प्रमुख विरोधी पक्षांमध्ये उभी फूट पाडून त्यांना क्षीण केल्यानंतर आपल्यासोबत आलेल्या गटांच्या सहाय्याने भाजप (BJP) आगामी महापालिका, जिल्हा परिषद (Maharashtra ZP Elections) आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवूनच पुढीलवर्षी होणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये वर्चस्व गाजविण्यासाठी पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. यापार्श्‍वभूमीवर पावसाळा संपताच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता वाढली आहे. (Maharashtra Municipal Elections)

 

केंद्रामध्ये सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. परंतू राज्यात एकटयाच्या बळावर लोकसभेत अपेक्षित यश मिळत नसल्याने भाजपने वर्षभरापुर्वी महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) पाडून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ५० आमदार फोडून राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देउनही वर्षभरामध्ये अपेक्षित यशाची खात्री नसल्याने नुकतेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोठया गटाला राज्य शासनामध्ये एन्ट्री देण्यात आली. यामुळे शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षातील गट आपसात झुंजत असताना कॉंग्रेसने अद्याप म्हणाविशी तयारी केलेली नाही. लागोपाठच्या लढायांमध्ये विरोधकांना नामोहरण केल्याच्या संधीचा फायदा उचलत भाजप स्थानीक स्वराज्य संस्थांवर पुन्हा ताबा मिळविण्याच्या तयारीत आहे. (Maharashtra Municipal Elections)

 

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, नवी मुंबई,सोलापूर, नागपूर सारख्या मोठ्या महापालिकांसह बहुतांश महापालिकांच्या तसेच अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका दीड ते अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत. सध्या या ठिकाणी प्रशासकराज असल्याने तळातील कार्यकर्ते देखिल निवडणुकांकडे लक्ष लावून आहेत. त्यामुळे सोबत असलेल्या मित्र पक्षांच्या साथीने मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूरसह मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या दृष्टीने हीच योग्य वेळ असून लोकसभेपुर्वी अर्थात येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी आहे, अशी चर्चा जाणकारांमध्ये सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल कालच मुंबईमध्ये येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेची निवडणुक होउ शकते, अशी शक्यता व्यक्त केल्याने चर्चेला दुजोरा मिळत आहे.

 

लोकसभा आणि विधानसभा एकत्र?

 

येत्या जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) घोषणा होईल.
मागील चार वर्षातील राज्यातील सत्तेचा सारीपाट पाहाता स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये
अपेक्षित यश मिळवून पुढील विधानसभेत देखिल निर्विवाद सत्तेसाठी भाजपची तयारी आहे.
यासाठीच लोकसभा आणि विधानसभा (Maharashtra Vidhansabha Elections) देखिल एकत्र होउ शकतात,
अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title : Maharashtra Municipal Election | As the strength of the opposition is divided, there is a possibility of
elections to municipal councils and district councils in October

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार

Maharashtra Political Crisis | ‘शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात, कारण…’, भाजप खासदाराचा खळबळजनक दावा