शरद पोंक्षे यांचे ६ महिने कर्करोगाशी ‘झुंज’ दिल्यानंतर रंगमंचावर पुनरागमन, शेअर केला अनुभव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी इंडस्ट्रीतील अभिनेता शरद पोंक्षे यांनी तब्बल ६ महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर त्यांनी हा लढा जिंकला असून ते त्यांच्या नाटकाच्या तालमीसाठी हजर झाले. हिमालयाची सावली असे या नाटकाचे नाव आहे. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे थिएटरमध्ये त्यांच्या या नाटकाची तालिम होती. यासाठी नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे, जयंत घाटे, विघ्नेश जोशी ही सर्व मंडळी पोंक्षेची वाट पहात होते. सडपातळ बांधा, डोळ्यावर चष्मा, डोक्यावर टक्कल, चेहऱ्याचे केस गेलेले अशा अवतारात ते दिसले. यावेळी नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी तर त्यांना मिठीच मारली.

‘नंतर कॅन्सरचं निदान झालं’
कर्करोगाशी दिलेल्या लढ्याबाबत बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, “डिसेंबरमध्ये मला ताप येत होता. रोज संध्याकाळी असंच व्हायचं. नंतर कॅन्सरचं निदान झालं. कंबरेच्या भागात गाठी तयार होऊन हा कॅन्सर होतो. याचदरम्यान मी सोनाली बेंद्रे आणि इरफान खान यांच्या बातम्या वाचत होतो. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टही पहात होतो. मला माझा आजार सार्वजनिकपणे जाहीर करायचा नव्हता. मला सहानुभूतीही नको होती. यामुळेच मी अलिप्त राहिलो. सहा महिने औषधोपचार, किमो थेरपी घेतल्यानंतर या आजारातून मी पूर्णपणे बरा झालो आणि तुमच्यासमोर आता उभा आहे.”

‘त्यामुळे मी दुप्पट ऊर्जेने यातून बाहेर पडलो’
पुढे पोंक्षे म्हणाले की, “या आजारातून बाहेर पडण्यासाठी मला सावरकरांची मदत झाली. त्यांनी अकरा वर्ष छोट्या खोलीत काढली होती. मला तर काही महिनेच काढायचे होते. मी सावरकरभक्त असल्याचा मला याचा मोठा फायदा झाला. यादरम्यान मी खूप गोष्टी आणि पुस्तकं वाचली. मला राजेशने दिलेलं हिमालयाची सावली हे नाटकंही मी वाचून काढलं. माझ्यासाठी राजेश, निर्माते गोविंद चव्हाण हे थांबले होते याचा मला खूप आनंद वाटतो. त्यामुळे मी दुप्पट ऊर्जेने यातून बाहेर पडलो.” शरद पोंक्षे यांनी सर्वांना धन्यावदही दिले.

शरद पोंक्षे यांनी आपल्या कर्करोग असल्याचे फारसे कुणाला सांगितले नव्हते. मुद्दाम त्यांनी हे लवपून ठेवले होते. यानंतर त्यांनी इंडस्ट्रीतील वावरही थांबवला होता. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ते आता नाटक करणार आहे. याशिवाय आगामी अग्निहोत्र २ या मालिकेतही ते दिसणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी ‘हे’ ५ घरगुती उपाय, जाणून घ्या

Loading...
You might also like