Actor Yash | दाक्षिणात्य सुपरस्टार यशने सोडले होते 16 व्या वर्षी घर: तेव्हा होते फक्त 300 रुपये हातात, आता कोट्यधीश

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य असा एक सुपरस्टार आहे ज्याचा चाहता वर्ग देशभर आहे तो म्हणजे केजीएफ फेम अभिनेता यश (Actor Yash). दाक्षिणात्य अभिनेता यश अर्थात नवीन कुमार गौडा (Naveen Kumar Gowda) याचा चाहता वर्ग असून त्याला सोशल मीडियावर देखील लाखो फॅन फॉलोविंग आहे. त्याच्या केजीएफ या चित्रपटाने (KGF Movie) तर देशभरातील बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अभिनेता यश याच्या हटके स्टाईलवर आणि उत्कृष्ट अभिनयावर चाहते फिदा आहे. आज कोट्यवधी रुपयांचा मालक असणारा अभिनेता यश (Actor Yash) याच्या हातात फक्त 300 रुपये होते.

‘केजीएफ स्टार’ अशी ओळख असणारा अभिनेता यश हा त्याच्या चित्रपटामधील अभिनयामुळे आणि चित्रपटाच्या यशामुळे नेहमीच चर्चेत असतो. जीवंत अभिनय करण्यात माहीर असणारा अभिनेता यश याचा जन्म कर्नाटकातील (Karnataka) एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. त्याचे खरे नाव हे यश नसून नवीन आहे. ‘नवीन कुमार गौडा’ असे त्याचे पूर्ण नाव आहे. प्रोफेशनमध्ये येण्यापूर्वी मात्र त्याने नाव बदलले. यशच्या आईच्या कुटुंबातून त्याचं नाव यशवंत ठेवण्यात आले होते. अभिनेत्याने पुढे इंडस्ट्रीत येण्याआधी त्याचं खरं नाव न लावता यशवंत नाव लहान करुन यश हे नाव त्याचं प्रोफेशनल नाव म्हणून स्वीकरलं. आज अभिनेता यशला ओळखणार नाही असा कोणताही चित्रपटप्रेमी सापडणार नाही.

अभिनेता यशला (Actor Yash) लहानपणापासूनच या सिनेविश्वाची ओढ होती. शालेय दिवसांपासून यशला अभिनयनाची आवड होती. ही आवड जोपासण्यासाठी त्याने अगदी वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडले होते. लहानपणी त्याने अनेक नाटकांत व डान्स स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. वयाच्या अगदी 16व्या वर्षी त्याला एका प्रोजेक्टसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करण्याची संधी मिळाली. मात्र हे काम बेंगळुरूला (Bangalore) होते. ते काम करण्यासाठी यशला आपलं घर सोडावं लागलं. त्यावेळी त्याच्या खिशात असलेल्या केवळ 300 रुपयांवर तो घर सोडून निघाला होता. अभिनेता यशचे ‘केजीएफ चॅप्टर 1’ (K.G.F: Chapter 1), ‘केजीएफ चॅप्टर 2’ (K.G.F: Chapter 2) आणि ‘मिस्टर ॲन्ड मिसेज रामाचारी’ (Mr. and Mrs. Ramachari) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Research on Social Media | मेंदूवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह प्रभाव पडतो की नाही? लेटेस्ट रिसर्चचा दावा आश्चर्यचकित करेल तुम्हाला

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला, केसगळतीला लागेल ब्रेक