अभिनेत्री अक्षरा सिंगनं ‘या’ गायकाविरूध्द केला ‘अश्लील’तेचा आरोप, पोलिसांकडे दिली तक्रार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एकापाठोपाठ एक असे अनेक भोजपुरी हिट गाणी देणारी जोडी अक्षरासिंग आणि रितेश पांडे यांच्यात इतके अंतर वाढले की हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. सिनेस्टार अक्षरा सिंगने भोजपुरी गायक रितेश पांडे याच्याविरोधात सारनाथ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. रितेशने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप तिने केला. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

अक्षरासिंगचा सारनाथ पोलिस स्टेशन परिसरात तिलमापुर येथे स्टुडिओ आहे. तक्रारीत म्हटले आहे की शनिवारी शूटिंग दरम्यान रितेश पांडे तेथे हजर होता. त्याने शूटिंग दरम्यानच अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर मारहाण आणि शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हे प्रकरण पोलिस ठाणे गाठल्यानंतर एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी चौकशी करून तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. रितेशला आपली बाजू मांडण्यासाठी सारनाथ पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगण्यात आले आहे.

भोजपुरी सिनेमाचे राइझिंग सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे रितेश पांडे आणि अक्षरा सिंह बर्‍याच वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. दोघांचे भोजपुरी गाणे हाय रे झुलनिया खूप गाजले होते. बिहारच्या रोहतास येथील मूळ रहिवासी असलेल्या रितेशला त्याच्या करुआ तेल या गाण्याने प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हे गाणे सुपरहिट असण्यामागे एक जबरदस्त कथा आहे.

रितेशने हे गाणे पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह केले आणि बिहार आणि उत्तर प्रदेशमधील दुकानांमध्ये जाऊन लोकांच्या मोबाईलमध्ये ते लोड केले. खूप कमी कालावधीतच हे गाणे मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाले होते. हे गाणे सुपरहिट झाल्यानंतर रितेशला अनेक अल्बमच्या ऑफर येऊ लागल्या. पियवा च्या पहिल्या गाण्याला 60 लाखांहून अधिक हिट्स मिळाले. यानंतर रितेशने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. नागिन गली गली, दरार 2 या चित्रपटांमधून तो झळकला. त्याचबरोबर अक्षरा सिंगबद्दल बघितले तर ती एक अभिनेत्रीबरोबर ती एक उत्तम गायिकाही आहे. अनेकदा अक्षरा सिंगचा फोटोशूट आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतो. अक्षरा सिंग स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.