Actress Amrita Rao | अभिनेत्री अमृता रावच्या प्रेमविवाहात अमीर खानची मोठी मदत; निभावली महत्त्वपूर्ण भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील (Bollywood) विवाह चित्रपटातील सोज्वळ, संस्कारी अशा अभिनेत्री अमृता राव (Actress Amrita Rao) हिला प्रेक्षक विसरु शकलेले नाही. अमृताने फार कमी चित्रपटात काम केले असले तरी त्या चित्रपटातील भूमिका आजही अनेकांच्या लक्षात राहिल्या आहेत. अमृता राव आणि आरजे अनमोल (Amrita Rao and RJ Anmol) यांनी लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर अमृता चित्रपटांमधून झळकली नसली तरी तिच्या लव्ह मॅरेजची एक मजेशीर कहानी आहे. आणि कहानीमध्ये अभिनेता अमीर खानने (Actor Aamir Khan) महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. अमीर खानने स्वत: या लग्नासाठी प्रयत्न केले असल्याचा खुलासा अनमोलने केला आहे. (Actress Amrita Rao)

मोठया पडद्यावरील अमृता एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचे आरजे अनमोल सोबत प्रेमसंबंध होते. त्यांना लग्न देखील करायचे होते. मात्र यासाठी अमृताच्या वडिलांना समजवायचे होते. आणि अमृताच्या वडिलांना समजावणे फार कठिण काम होते. अशावेळी अमृताच्या वडिलांना अनमोल विषयी सांगायचे शिवधनुष्य अभिनेता अमीर खानने उचलेले. काही दिवसांपूर्वी अनमोलने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली होती. यावेळी आरजे अनमोलने अमृता आणि त्याच्या लग्नाबाबतच्या काही गोष्टी गमतीदार शेअर केल्या.

अनमोलने सांगितले की,अमृताच्या वडिलांना लग्नासाठी मनवणं हे सोपं काम नव्हतं.
अनमोलने थिएटरमध्ये रेट्रो सिनेमांचं स्क्रिनिंग सुरू केलं होतं. त्यावेळी शमी कपूर (Shammi Kapoor) स्टारर
‘तिसरी मंजील’ (Teesri Manzil) हा त्यापैकी एक सिनेमा होता. त्यावेळी आमिर खानने हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अमृताचे वडील आमिरसह स्क्रिनिंगसाठी गेले होते. यादरम्यान आमिर संपूर्ण रस्त्यात अनमोलचं कौतुक करत होता.

या स्क्रिनिंगवेळी अमृताचे वडील उपस्थित असतील आणि त्यांच्यासमोर आमिरने अनमोलच कौतुक करावं अशी
विनंती अनमोलने आमिर खानला आधीच केली होती.
या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी अनमोल पहिल्यांदाच अमृताच्या वडिलांना भेटणार होता.
आमिर खानने अनमोलची ही विनंती मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे सगळा प्लॅन पार पडला.

अनमोलने कपिल शर्मा शोमध्ये कबुल केले की आमिर खानच्या मदतीमुळे अमृताच्या वडिलांच्या नजरेत त्याची उंची वाढली आणि त्यांनंतर त्यांनी लग्नाला होकार दिला.
अमृता आणि अनमोलने 2016 साली लग्नगाठ बांधली.
त्यानंतर 1 नोव्हेंबर 2020 मध्ये अमृताने (Actress Amrita Rao) गोंडस मुलाला जन्म दिला.

अभिनेत्री अमृता रावने विवाह (Vivah), इश्क विश्क (Ishq Vishk), मै हूं ना (Mai Hoon Na),
वेलकम टू सज्जनपूर (Welcome to Sajjanpur) अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तिची विवाह मधील भूमिका खूप गाजली होती.

Web Title :   Actress Amrita Rao | aamir khan helped in actress amrita rao and rj anmol wedding plan what was happened

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या 3 गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 1 काडतुस जप्त

Congress Leader Mohan Joshi | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी – मोहन जोशी

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ