Actress Disha Patani | मुंबईमध्ये केवळ 500 रुपये घेऊन आलेल्या अभिनेत्रीने घेतले 5 कोटींचे घर

पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील अनेक तरुणांची क्रश असलेली अभिनेत्री दिशा पाटनी (Actress Disha Patani) ही सध्या टॉपची अभिनेत्री आहे. दिशा आता अभिनयाच्या जोरावर आणि मॉडेलिंगच्या जोरावर अनेक चित्रपटांमध्ये झळकत आहे व अनेक ब्रॅडची ती अॅम्बेसेडर आहे. दिशाच्या एका चित्रपटामुळे तिचे नशीब पालटले आणि ती प्रकाशझोतात आली. दिशाची ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ट स्टोरी’ (MS Dhoni: The Untold Story) या चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली. (Actress Disha Patani)

दिशाचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये (Pithoragarh, Uttarakhand) झाला. दिशाचे वडिल डीएसपी अधिकारी होते तर ते कुटुंबासोबत युपीमधील बरेली (Bareilly, UP) येथे राहत होती. दिशा पाटनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून नोएडा येथील एमिटी यूनिवर्सिटीमध्ये (Amity University, Noida) तिने शिक्षण घेतले आहे. दिशाने करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. 2013 साली तिने पॉन्ड्स फेमिना मिस इंडियामध्ये (Pond’s in Femina Miss India 2013) भाग घेतला, यास्पर्धेत ती फर्स्ट रनरअप ठरली. तिथून तिचा प्रवास सुरु झाला.

दिशाने 2015 साली मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. तिने दक्षिण भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक जगन्नाथ पुरी (Director Jagannath Puri) दिग्दर्शित लोफर (Loafer Movie) या सिनेमामध्ये तिने पहिल्यांदा काम केले. यामध्ये ती अभिनेता वरूण तेजसोबत (Actor Varun Tej) दिसली होती. या चित्रपटात तिने हैदराबादमधील एका मुलीची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटातील कामामुळे तिच्या करिअरमध्ये काही खास फरक पडला नाही. मात्र 2016 साली प्रदर्शित झालेल्या भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) यांच्या बायोपिक सिनेमामधील भूमिकेने दिशाचे नशीब पालटले. ती यामध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Actor Sushant Singh Rajput) सोबत महेंद्र सिंगची पहिली प्रेयसी प्रियंकाच्या भूमिकेमध्ये ती झळकली. दिशाची ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. तिच्या या सिनेमासाठी बेस्ट डेब्यू या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.

या चित्रपटानंतर दिशाने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर दिशाने अनेक हिट चित्रपट तर दिलेच अनेक इंटरनॅशनल ब्रँडसाठी ती ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. मात्र एका रिपोर्टनुसार दिशा मुंबईमध्ये केवळ 500 रुपये घेऊन आपले नशीब आजमावायला आली होती. दिशाने सांगितले की, ‘मी एकटी राहत होते. काम करत होते परंतु कधीही कुटुंबाकडे मदत मागितली नाही.’

आता दिशाने मुंबईतील वांद्रे (Bandra, Mumbai) येथे स्वत:चं घर घेतलं.
2017 साली दिशाने स्वतःलाच हे घर गिफ्ट केल होतं. आता दिशा पटानीने (Actress Disha Patani) आणखी एक
घर घेतलं आहे. या नव्या घराचे नाव ‘लिटिल हट’ असे आहे. दिशाच्या या नव्या घराची किंमत ५ कोटी रुपये एवढी आहे. केवळ 500 रुपये घेऊन आलेल्या दिशाने आता 5 कोटी रुपयांचे घर घेतले आहे. सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री दिशाचा आज वाढदिवस आहे. दिशा आज तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Web Title :  Actress Disha Patani | bollywood birthday of disha patani know her life interesting facts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा, शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेकडून जाहिरातबाजी

Cyclone Biporjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळामुळे 67 रेल्वे गाड्या रद्द; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

Manohar Joshi Health Updates | मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत 22 दिवसांच्या उपचारानंतर सुधारणा

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? 1 लिटरसाठी द्यावे लागतील इतके रुपये; जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुणेकरांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Marketyard Fir News | मार्केटयार्ड परिसरात भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर जखमी