‘खल्लास गर्ल’ इशा कोप्पीकर विधानसभेच्या रिंगणात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईशा कोप्पीकर मागील काही दिवसांत रुपेरी पडद्यावर झळकली नसली तरी ती पडद्यामागे प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ईशाने याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाने भाजपचे ‘कमळ’ हातात घेतले होते.

ईशा आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण ईशा निवडणूक लढवणार नसून ती भाजपचा प्रचार करणार आहे. आता कुठे राजकारणात माझा जन्म झाला आहे. नेमकं राजकारण काय असतं, हे समजून घेण्यासाठी मला ग्राउंड वर्क करायचे आहे. त्यामुळे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार असल्याचे ईशाने एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ईशाने यावेळी राजकारण आणि फिल्मी करियरवर दिलखुलास गप्पा मारल्या. मुलगी लहान असल्यामुळे सिनेमापासून लांब असल्याचे तिने सांगितले. परंतु, ती लवकरच रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. फॅमिलीसोबत ती बिझनेसही संभाळत आहे.

नेमकं काय म्हणाली इशा भाजपबद्दल
भाजपचे उत्तम पद्धतीने सुरू आहे. पहिले पाच वर्षे तुम्ही फक्त ट्रेलर पाहिला आता सिनेमा सुरू झाला असल्याचे ईशाने सांगितले. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल केले आहे.

देशातील महिलांनी आणखी सक्षम व्हावे, अशी नरेंद्र मोदी यांची मनीषा आहे. महिलांसाठी अनेक योजना नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आल्याचे ईशाने सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like