जान्हवी कपूर बनली पायलट ; फोटाे झाला व्हायरल व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था – श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर आता पुन्हा एकदा करण जोहर यांच्या सिनेमात झळकणार असल्याचं समोर आलं आहे. जान्हवीच्या दुसऱ्या आगामी सिनेमातील तिचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जान्हवी कपूरने ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली. दिग्दर्शक करण जोहरनं या सिनेमाची निर्मिती केली होती.

https://twitter.com/JanhviFC/status/1077774100553236486

तख्त असं या आगामी सिनेमाचं नाव आहे.  करण जोहर यांच्या ‘तख्त’ सिनेमातून जान्हवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भारतातील पहिली महिला कॉम्बॅट पायलट गुंजन सक्सेना हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. गुंजन सक्सेनाने 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान स्वत:चा जीव धोक्यात घालून जवानांचे प्राण वाचवले होते. यावर आधारीत हा सिनेमा असणार आहे.

आपला जीव धोक्यात घालून अनेक जवानांचे प्राण वाचवणाऱ्या गुंजनने युद्धात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं होतं. तिच्या या कामगिरीसाठी तिला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

जान्हवीच्या आगामी सिनेमातील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार हे समोर आलं आहे, मात्र या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.