‘चितळेबाई आधी स्वत:ची पितळे सांभाळा, नंतर तुमची अक्कल पाजळा’, ‘त्या’ वादग्रस्त पोस्टवरून अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा ‘ट्रोल’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री केतकी चितळे गेल्या काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहे. याचं कारण म्हणजे तिच्या वादग्रस्त पोस्ट. पुन्हा एकदा केतकी एक पोस्ट शेअर करत वादाला तोंड फोडलं आहे. तिच्या दारू पिण्याच्या फोटोवरून तिच्यावर झालेल्या टीकेला तिनं उत्तर दिलं आहे आणि पुन्हा ट्रोल झाली आहे.

केतकीनं एक पोस्टशेअर केली आहे. यात दोन फोटो आहेत. एका बाजूला आरोप आणि दुसऱ्या बाजूला सत्य असं यावर लिहिलं आहे. एक बाजूला ती दारू पिताना दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला दारूतून मिळणारा कर याची बातमी असलेला फोटो आहे. परंतु केतकीनं ही पोस्ट शेअर करताच ती अधिकच ट्रोल होऊ लागली.

याआधीही केतकीनं सोशलवर एक पोस्ट लिहिली होती ज्यात तिनं महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. केतकीच्या या पोस्टनं अनेकजण संतापले होते. अनेक शिवप्रेमींनी राग व्यक्त केला होता. अनेकांनी तिला जोरदार ट्रोल केलं होतं. शिवसेनेच्या एका विभागप्रमुखानं तिला धमकी दिल्याचा आरोप केला होता. तिनं काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले होते.

केतकीच्या या प्रकारानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तिला नेमकं काय झालं आहे असं काहींनी म्हटलं होतं. तर वादात राहून पब्लिसिटी मिळवण्याचा हा फंडा तिला महागात पडेल असंही काहीलोक म्हणाले. केतकी बद्दल वेगवेगळी चर्चा होत आहे.