अभिनेत्री क्रांती रेडकरच्या रेड साडीतील फोटोंनी चाहत्यांचं ‘लक्ष’ वेधलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री क्रांती रेडकरनं आज फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. अभिनयाव्यतिरीक्त क्रांती डान्ससाठीही ओळखली जाते. परंतु लवकरच क्रांती डान्स आणि अभिनयापेक्षा वेगळं काहीतरी करणार आहे. लवकरच क्रांती निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

क्रांतीनं नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये क्रांती म्हणते, “Shot for something really exciting and enriching. will update soon.”

मिळालेल्या माहितीनुसार, क्रांती झी युवावरील मैफिल या सांगितिक कार्यक्रमात सूत्रसंचालन कराताना दिसणार आहे. क्रांतीनं यापूर्वी दिग्दर्शनातही हात आजमावला आहे. यानंतर आता ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

क्रांतीनं अलीकडेच तिचा इिया झायदा हा फॅशन ब्रँड लाँच केला होता. प्लॅनेट टॅलेंटच्या साहाय्यानं क्रांतीनं हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. क्रांतीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 2017 मध्ये तिनं आयपीएस अधिकारी समीर वानखेडे सोबत लग्न केलं. गेल्या वर्षीच तिनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. त्यांच्या झिया आणि झायदा या नावावरून तिनं फॅशन ब्रँडचं नाव ठेवलं आहे.

क्रांतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं मराठीतील जत्रा, फक्त लढ म्हणा, नो एन्ट्री पुढे धोका आहे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिनं हिंदी सिनेमातही काम केलं आहे. गंगाजल या सिनेमातदेखील क्रांती दिसली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/