प्रिया दत्त यांचा पत्ता कट; नगमांची वर्णी ?

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन
मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून २०१९ मध्ये दिग्गज नेते दिवंगत सुनील दत्त यांच्या कन्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांच्या ऐवजी अभिनेत्री नगमा यांना काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. प्रिया दत्त यांना काँग्रेस पक्षाने सचिव पदावरून काढून टाकले आहे. पक्षात निष्‍क्रीय राहिल्याचा त्यांना फटका बसल्याचे मानले जात आहे. .नगमा या सध्या जम्‍मू काश्‍मीर आणि पदुच्‍चेरी येथे ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cde0d7d8-c639-11e8-b199-5141eb980654′]

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या रविवारी झालेल्या बैठकीत प्रिया दत्त यांना उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रिया दत्त यांच्या उमेदवारीस विरोध केला होता. प्रिया दत्तच मुख्य दावेदार आहेत. परंतु, त्यांना सचिव पदावरून हटवल्याने यावेळी दुसर्‍या नावाचाही विचार होऊ लागला आहे .

दरम्यान नगमा यांनी तिकीट मिळण्याची शक्यता  नाकारली आहे . काँग्रेसचे पक्षश्रेष्‍ठीच कोणी कुठून निवडणूक लढवायचे हे ठरवतील, असे नगमा म्‍हणाल्या. नगमा या पक्षश्रेष्‍ठींच्या जवळच्या मानल्या जात आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणूक त्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून लढवली होती. परंतु, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. याशिवाय त्या तामिळनाडू आणि बिहारमध्ये त्या पक्षाच्या प्रभारीही राहिल्या आहेत.

Bigg Boss चा धमाका…. अनुप-जसलीनचे ब्रेकअप!

प्रिया दत्त यांच्या समर्थकांतून नाराजी

माजी खासदार प्रिया दत्त यांना अचानक सचिव पदावरून हटवल्याने समर्थकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे. सोमवारी दत्त यांनी समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्‍न केला. त्यांनी ट्विट करून म्‍हटले आहे की, “जर कोणी एखादा व्यक्‍तीच पदावर कायम राहिल्यास इतर उमेदवारांनी कुठे जायचे? यात नाराज होण्यासारखे काही नसून यामुळे नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे.”

[amazon_link asins=’B0785JJF7L,B075FY4RWK,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’171e62aa-c63a-11e8-b88d-4942b4fdd579′]

जाहीरात