Actress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत हल्लेखोर पसार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Actress Payal Ghosh | पायल घोष (Actress Payal Ghosh) या अ़भिनेत्रीवर काही अज्ञांतानी हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप पायल घोषने केला आहे. स्वत: तीने व्हिडीओ पोस्ट करत या घटनेबाबत माहिती दिली आहे. पायल घोष ही मुंबईच्या अंधेरी परिसरात वास्तव्यास आहे. घरातून निघून कारमध्ये बसताना तिच्यावर काही अज्ञांतानी हल्ला केला. हल्लेखोरांनी चेहरा मास्कने झाकल्यामुळे तिला त्यांची ओळख पटली नाही. त्यावेळी हल्लेखोरांनी तीच्याजवळचे काही सामान हिसकावून पलायन झाले आहेत.

पायल घोषने (Actress Payal Ghosh) व्हिडिओतून सांगितले आहे की, मी काही औषधं विकत घेण्यासाठी घरातून बाहेर पडली. माझ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करताना अचानक काही अज्ञातांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात एक बाटली होती. त्यात नेमकं काय होतं माहित नाही. पण त्या बाटलीत अॅसिड असल्याचा मला संशय आहे. त्यांनी माझ्यावर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी मी ओरडले तेव्हा त्यांच्या हातातील रॉड माझ्या डाव्या हातावर पडला आणि मी जखमी झाले. मी जोरजोरात ओरडले तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला.

अभिनेत्री पायल घोषने 2017 मध्ये ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटात अभिनेते परेश रावल यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये पायलने विशेष कामगिरी केली नाही. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने ‘साथ निभाना साथिया 2’ या हिंदी मालिकेत देखील काम केलं होतं. दरम्यान, पायलने अलिकडेच चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात (Anurag Kashyap) लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

Web Titel :- Actress Payal Ghosh | payal ghosh claims she escaped acid attack says got away with minor injuries

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर रद्द; ‘त्या’ आमदाराच्या पत्राची मात्र जिल्ह्यात ‘तुफान’ चर्चा

Pune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत कर’ विभाग उपेक्षित; जाणून घ्या नेमकं काय झालं

ST Driver Suicide | धक्कादायक ! एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ