Nashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर रद्द; ‘त्या’ आमदाराच्या पत्राची मात्र जिल्ह्यात ‘तुफान’ चर्चा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik SP Sachin Patil | गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे नाशिकचे (Nashik SP Sachin Patil ) ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांची बदली (Transfer) अखेर रद्द करण्यात आली आहे. गुन्हेगारांना सळो कि पळो करुन सोडणारे नाशिकचे दबंग एसपी पाटील यांची बदली अखेर थांबवण्यात आली आहे. मॅट कोर्टाने (Mat Court) तूर्तास स्थगिती दिली. तसेच या बदलीबाबत डिसेंबर अखेर निर्णय घेऊ असे निर्देश देखील कोर्टाकडून देण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील 32 आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामुळे सचिन पाटील (Nashik SP Sachin Patil) यांची बदली राज्याच्या गुप्तवार्ता विभागातील आयुक्तपदी करण्यात आली होती. आणि नाशिक पोलिस अधीक्षकपदी शहाजी उमाप (SP Shahaji Umap) यांची बदली करण्यात आली. दरम्यान, बदली केल्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत होता. कारण एसपी पाटील यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीवर वचक बसवला होता. अनेक अवैध धंदे व्यवसायावर त्यांनी धडाकेबाज कारवाई केली होती. यामुळे जनसामान्यांत त्याचं नाव झालं होतं. मात्र बदलीमुळे तेथील लोकांनी स्वतः रस्त्यावर उतरत विरोध केला. त्याचबरोबर एसपी पाटील यांची बदली रद्द करावी अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) याच्यांकडेही केली होती. अखेर त्यांची बदली रद्द झाल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण एसपी सचिन पाटील (Nashik SP Sachin Patil ) यांनी अनेक अशा गुन्हेगारांवर लगाम लावला होता.
जिल्ह्यात रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्टी, अवैध गुटखा प्रकरणांमध्ये त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली होती.
तसेच रोलेट किंगचा पर्दाफाश केला. काही महिन्यामध्ये त्यांनी केलेल्या जलद कारवाईमुळे त्याचं नावाची सर्वसामान्यात चर्चा होती.
गुन्ह्यांचा जलद तपास केल्याने त्यामुळेच त्यांची बदली केल्याचा आरोप होता.
दरम्यान, पाटील यांच्या बदलीचे प्रकरण मॅट न्यायालयात गेले होते.
न्यायालयाने कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना फक्त एका आमदाराच्या पत्रावरून बदली केल्याबाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढल्याचे समजते.
विशेष म्हणजे पाटील यांची बदली करण्यासाठी उत्सुक असणारा ‘तो’ आमदार (MLA) कोण? यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे.

Web Titel :- Nashik SP Sachin Patil | transfer of nashik district superintendent of police canceled who is the mla writing the letter for patils transfer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत कर’ विभाग उपेक्षित; जाणून घ्या नेमकं काय झालं

ST Driver Suicide | धक्कादायक ! एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ ! पुण्यात पोलीस हवालदाराची पकडली ‘कॉलर’