ST Driver Suicide | धक्कादायक ! एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – ST Driver Suicide | येथील बस चालकाने एसटीतच गळफास (ST Driver Suicide) घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये घडला आहे. सुभाष तेलोरे (Subhash Tellore) असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (21 सप्टेंबर) रोजी पहाटे 6.30 च्या सुमारास घडली असावी अशी माहिती समोर येते.

पाथर्डी -नाशिक (Pathardi-Nashik) या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला (sangamner) बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला. एसटी चालक सुभाष तेलोरे हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डी येथील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

Web Titel :-  st bus driver suicide in bus in sangamner of nagar district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ ! पुण्यात पोलीस हवालदाराची पकडली ‘कॉलर’

Gold Price Today | खूशखबर ! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी; बळकाविला फ्लॅट, जाणून घ्या प्रकरण