10 वर्षाने लहान असलेल्या निकसोबत लग्‍न केलेली अभिनेत्री प्रियंका म्हणते..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचे पती निक जोनस यांच्यामध्ये १० वर्षाचे अंतर आहे. यामुळे प्रियांका अनेकदा सोशल मिडियावर ट्रोल झालेली आहे. नुकत्याच मॅगझीनच्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले की, ‘जी लोकं वयाबद्दल कमेंट करतात. ते खूप क्रुर आहे.’

सध्या बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा खुपच चर्चेत असते. वेगवेगळे विषय घेऊन ती सोशल मिडियावर प्रसिद्ध होत असते. नुकतिच ती निकसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. दोघांचे बॉडिंग पाहता त्या दोघात खुपच प्रेम असल्याचे दिसून येत आहे.

प्रियांकाने २०१८ मध्ये सिंगर निकसोबत जयपूरमध्ये लग्न केले. लग्नाच्यावेळी प्रियांका ३६ वर्षाची आणि निक २६ वर्षाची होते. यानंतर वयाबद्दल प्रियांका सारखीच ट्रोल होत गेली. प्रियांकाने मुलाखतीत सांगितले की, जर मुलाचे वय जास्त असेल तर कोणी या गोष्टीवर बोलत नाही. याउलट लोकांना असे आवडते.

प्रियांका आणि निकच्या वयाबद्दल लिहलेल्या आर्टिकलला प्रियांकाच्या सासवाडीतील लोकांनी देखील विरोध केला होता. प्रियांकाला निकचे घरचे सपोर्ट करतात पण प्रियांका म्हणते की, ‘मी निकसोबत लग्न केले याचा मला गर्व वाटत नाही कारण निक माझ्यापेक्षा खूप लहान आहे.’