Actress Shruti Haasan | अभिनेत्री श्रुती हासन बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट; एअरपोर्टवर दिले आलिंगन

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सिनेमांपासून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी श्रुती हासन (Actress Shruti Haasan) प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कमल हासन (Kamal Haasan) व अभिनेत्री सारिकाची मुलगी असलेल्या श्रुतीने आता बॉलीवुडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. श्रुतीचा चाहता वर्ग मोठा असून तिच्या लाईफ अपडेटसवर चाहत्यांच्या नजरा असतात. अभिनेत्री श्रुती हासन (Actress Shruti Haasan) तिच्या बॉयफ्रेंडसोबत एयरपोर्टवर स्पॉट झाली आहे. यावेळी ती बॉयफ्रेंडला (Shruti Haasan Boyfriend) निरोप देताना मिठी मारताना दिसली.

अभिनेत्री श्रुती हासनच्या निखळ सौंदर्यांचे आणि अभिनयाचे अनेक लोक चाहते आहेत. तिचा ‘रमय्या वस्तावय्या’ (Ramayya Vasthavayya) हा बॉलीवुड चित्रपट गाजला होता. तेव्हा तिच्या अभिनयामुळे ती चर्चेत आली होती आता श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रुती तिचा बॉयफ्रेंड शंतनू हजारिका (Shantanu Hazarika) सोबत एयरपोर्टवर दिसून आली. यावेळी तिने पापाराझींसमोर प्रेमाने मिठी मारली. त्यांचे हे प्रेमळ क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून चाहत्यांना ते पसंत पडत आहे. श्रुती आणि शंतनू यांनी निरोप देताना एकमेंकांना घट्ट मिठी मारली. त्या दोघांचे अनेक क्वालिटी टाईम घालवलेले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Shruti Haasan Love Affairs). आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.

सध्या श्रुती हासन (Actress Shruti Haasan) तिच्या अफेअरस् बरोबरच तिच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे. श्रुती लवकरच ‘सालार’ (Salaar) या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये श्रुती सोबत अभिनेता प्रभास (Actor Prabhas), अभिनेता यश (Actor Yash) व पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) हे सुपरस्टार अभिनेते काम करणार आहेत.

Web Title :   Actress Shruti Haasan | shruti haasan embraces boyfriend at the airport adorable video steals the headlines watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा