सोनाली नंतर आता ‘या’ अभिनेत्रीलाही झाला कॅन्सर

मुंबई  : वृत्तसंस्था – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अभिनेता इरफान खानला कॅन्सर झाल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीला कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांनी कॅन्सर झाला असून त्यांना तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं त्यांनी स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.
नफिसा यांनी इन्स्टाग्रामवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत कॅन्सर झाल्याची माहिती दिली. ‘माझा कॅन्सर तिसऱ्या स्टेजचा असून या कठीण प्रसंगातून सामोरं जाण्याचं धैर्य मला माझ्या मैत्रिणीकडून मिळालं आहे. तिनेच मला हा लढा देण्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत’, असं नफिसा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नफिसा यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कॅन्सर तिसऱ्या स्टेजपर्यंत गेल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. नफिसा यांची पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.
दरम्यान, नफिसा या प्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आर.एस.सोढी यांच्या पत्नी आहेत. नफिसा या १९७६ च्या मिस इंडियाचा ठरल्या असून त्याकाळी एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून त्यांची ओळख होती. इतकंच नाही तर मॉडलिंग क्षेत्राप्रमाणेच कलाविश्वातही त्यांचा वावर होता. त्यांनी धर्मेद्र आणि सलमान खान यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत चित्रपटात काम केले आहे.