Adani Wilmar IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या तज्ञांचे मत आणि GMP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Adani Wilmar IPO 31 जानेवारी रोजी, सोमवार म्हणजे आजच बंद होईल. या IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा आजचा शेवटचा (Adani Wilmar IPO) दिवस आहे. तुम्हालाही यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आज संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी IPO ला सब्सक्राइब करा. हा IPO 27 जानेवारी रोजी उघडण्यात आला होता. अदानी विल्मार ही अदानी ग्रुपची शेअर बाजारात लिस्ट होणारी सातवी कंपनी असेल.

 

हा IPO उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जवळपास दीडपट भरला गेला होता. मार्केट एक्सपर्टचे असे म्हणणे आहे कि या घसरत चाललेल्या बाजारपेठेत याचे इतके सभासद होणे चांगले मानले जाईल, IPO सबस्क्रिप्शनसाठी शेवटचा दिवस शिल्लक (Adani Wilmar IPO) राहिला आहे. या संदर्भात आयपीओची स्थिती अधिक चांगली मानली जात आहे.

 

प्राइस बँड रु. 218 ते रु. 230
अदानी विल्मार ही FMCG फूड कंपनी आहे. या IPO ची लॉट साइज 65 शेअर्स एवढी आहे.
या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉट गुंतवले जाऊ शकतात.
म्हणजेच या IPO मध्ये किमान रु 14,950 ( ₹ 230 x 65) आणि कमाल रु 1,94,350 [( ₹ 230 x 65) x 13] ची गुंतवणूक करता येईल.
कंपनीने या इश्यूची किंमत 218 रुपयांवरून 230 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे.
या IPO च्या माध्यमातून कंपनी 3600 कोटी रुपये जमा करेल.

 

GMP
ग्रे मार्केट पाहणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अदानी विल्मारच्या शेअरला आज ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम मिळत आहे,
जो दोन दिवसांपूर्वीच्या 47 रुपयांच्या GMP पेक्षा कमी आहे.
त्यांचे असे म्हणणे आहे की, 2 दिवसांच्या बीडिंगनंतर, IPO चे ग्रे मार्केट आणि सबस्क्रिप्शन स्टेटस हे दर्शविते की बाजारात नकारात्मक भावना असूनही, या IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम मागील 3 दिवसांपासून 45 ते 40 रुपये इतकाच राहिला आहे.
जे या IPO साठी चांगली लक्षणे आहेत.

खरेदी सल्ला.
अदानी विल्मरच्या IPO वर खरेदीचा सल्ला देताना, Trustline Securities च्या अपराजिता सक्सेना (aparajita saxena) म्हणतात की कंपनचे, ब्रँडेड कुकिंग ऑइल आणि पॅकेज्ड फूड व्यवसायात नेतृत्व चांगल्या स्थानावर आहे.
कंपनीचा ब्रँड हा खूप नामांकित आहे तसेच ग्राहकवर्ग हि खूप मोठ्या प्रमाणात आहे.
यासोबतच त्याचा प्रोडक्ट पोर्टफोलिओ ही खूप वैविध्यपूर्ण आहे. देशातील वाढता वापर आणि सरकारच्या प्रोत्साहनात्मक धोरणांमुळे एफएमसीजी कंपन्यांचे दिवस चांगले दिसत आहेत.
तसेच यामध्ये खाद्यतेलाच्या साठ्यातही चांगली वाढ होऊ शकते.

 

त्याचप्रमाणे ग्रीन पोर्टफोलिओचे अनुज जैन (anuj jain) यांचे असे मत आहे की अदानी विल्मारचा खाद्यतेलाच्या बाजारपेठेत 18.3 टक्के वाटा आहे. कंपनीचा पुढील दृष्टीकोन खूप चांगला दिसत आहे. हा IPO दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवला पाहिजे.

 

Web Title :- Adani Wilmar IPO | adani wilmar ipo final day know expert opinion and gmp before investing

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा