Bigg Boss 15 Winner | अखेर तेजस्वी प्रकाशनं पटकवला बिग बॉस 15 चा ‘किताब’, सलमान खानने ट्रॉफीसोबतच दिले रोख 40 लाख रूपये

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच प्रसिद्ध असणारा शो म्हणजे बिग बॉस (Bigg Boss 15 Winner). कालपासून सगळ्या प्रेक्षकांचे डोळे विजेता कोण होणार यावर लागले होते. शेवटच्या टप्प्यामध्ये प्रतिक सहजपाल (Pratik Sahajpal) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे दोन स्पर्धक राहिले होते. मात्र तेजस्वी प्रकाशनं (Bigg Boss 15 Winner) या सिझनमध्ये बाजी मारून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.

 

‘बिग बॉस 15’ च्या सिझनमध्ये शमिता शेट्टी (Shamita Shetty), करण कुंद्रा (Karan Kundrra), रश्मि देसाई (Rashmi Desai), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), निशांत भट्ट (Nishant Bhatt) आणि प्रतिक सहजपाल (Pratik Sahajpal) हे कलाकार टॉप 6 च्या अंतिम फेरीत पोहोचले होते. या कार्यक्रामाचा अंतिम टप्पा अत्यंत थाटात पार पडला. दीपिका पादुकोण (Deepika Padukone), कतरिना कैफ (Katrina Kaif) यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या ग्रॅंन्ड फिनालेला हजेरी लावली होती.

 

 

या कार्यक्रमाचा अंतिम क्षण अत्यंत भावनिक आणि भावस्पर्शी झालेला पाहायला मिळाला. कारण या सोहळ्यात ‘बिग बॉस 13’ चा विजोता म्हणजेच दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) श्रध्दांजली वाहण्यात आली. बिग बॉसमध्ये किती जरी भांडण होत असलं, तरी स्पर्धकांच्या एकमेकांबद्दलच्या काळजीने, प्रेमाने बिग बॉसच्या घराला घरपण येत. परंतु हा प्रवास इथेच संपला असून, आता लवकरच सिझन 16 येण्याची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहे.

 

मात्र, ‘बिग बॉस 15’ चा किताब तेजस्वी प्रकाशनं (Bigg Boss 15 Winner) मिळवला असून,
तब्बल 40 लाख रूपयांच रोख बक्षिस तिला मिळालं आहे.
हा क्षण तिच्यासाठी (Tejasswi Prakash) अत्यंत अभिमानास्पद असून,
लवकरच ती ‘नागिन 6 (Naagin 6)’ मधून प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

 

 

Web Title :- Bigger Boss 15 | bigg boss 15 grand finale tejasswi prakash wins salman khans show beats pratik sehajpal and karan kundrra read latest details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा