Pune Crime | कोंढव्यात गगन एमिरल्ड सोसायटी पार्किंगमधील जागेवर अतिक्रमण केल्याने इरफान मुलाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Crime | शहरात पार्किंगची समस्या (Parking Problem) दिवसेंदिवस वाढत असून लोकांकडे एकापेक्षा अधिक गाड्या झाल्याने आता मोठमोठ्या सोसायटीमध्येही पार्किंगवरुन वाद वाढू लागले आहेत. कोंढव्यातील गगन एमिरल्ड (Gagan Emerald Kondhwa) सोसायटीत पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण (Encroachment) केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी हमजा मोहम्मद हुसेन आगा Hamza Mohammad Hussain Aga (वय 35, रा. गगन एमिरल्ड सोसायटी,कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इरफान मुलाणी (Irfan Mulani) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2020 ते 27 जानेवारी 2022 दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) दिलेल्या माहितीनुसार, हमजा आगा यांनी गगन एमिरल्ड या सोसायटीत फ्लॅट घेतला. फ्लॅट खरेदी करताना बिल्डरने त्यांना पार्किंग स्लट नं. 58 हा दिला आहे. साेसायटीतील सदस्य इरफान मुलाणी यांना पार्किंगचा स्लॉट नं. 55 दिला आहे. असे असताना त्यांनी बिल्डरसोबत असलेल्या रागातून आगा यांना त्यांच्या पार्किंगचा वापर करता येणार नाही अशा रितीने त्यांची पार्किंगची जागा अडवून त्यांच्या पार्किंगच्या जागेत चारचाकी गाडी पार्क केली आहे.

दरम्यान त्यांना अनेकदा विनंती केल्यानंतरही मुलाणी यांनी पार्किंगवर अतिक्रमण चालू ठेवले आहे. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी अतिक्रमण केल्याबद्दल IPC 447 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहे.

Web Title : Pune Crime | Irfan Mulani charged with encroaching on Gagan Emerald Society parking lot in Kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’