Aditi Patange Pune | पुणेकर असलेल्या आदिती पतंगेला ‘मिस इंडिया वॉशिंग्टन’ प्रतिष्ठेचा बहुमान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aditi Patange Pune | अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यामध्ये सियाटल येथे झालेल्या स्पर्धेत एका पुणेकर तरूणीने प्रतिष्ठेचा बहुमान संपादन केला आहे. मुळची पुण्याची (Pune News) असलेली आणि मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली आदिती पतंगे (Aditi Patange Pune) या तरुणीने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन (Miss India Washington) यूएसए वर्ष (2021-22) मधील हा प्रतिष्ठेचा बहुमान मिळवला आहे. ‘बेस्ट स्माईल’ची देखील आदिती विजेती ठरली आहे.

 

आदिती (Aditi Patange Pune) ही संगीता (मांडवगडे) पतंगे (Sangita (Mandavagade) Patange) व प्रवीण पतंगे (Praveen Patange) यांची एकुलती एक मुलगी आहे. पुण्यातील भारती विद्याभवन (Bharti Vidyabhavan Pune) येथे आदितीचे 4 थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. 12 वी पर्यंतचे आगामी शिक्षण मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये (Millennium National School) झाले आहे. वयाच्या सतराव्या वर्षी आदिती उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला (America) रवाना झाली. अमेरिकेत तिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिग्री मिळवली. तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ती मायक्रोसॉफ्ट या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळवली.

 

लहानपणापासून आदितीला मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती. कोरोना महामारीत आदितीने घरातून काम करून अम्पॉवरींग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘मिस इंडिया वॉशिंग्टन  (Miss India Washington) यूएसए (2021-22) स्पर्धेत उतरली. त्यानंतर 22 स्पर्धकांमध्ये तीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, ही एक स्टेट लेव्हल स्पर्धा होती. येथील सर्व स्पर्धक वॉशिंग्टन स्टेट मधील होते. आता आदिती ऑगस्ट 2022 मध्ये नॅशनल लेव्हल ‘मिस इंडिया युएसए’ (National level ‘Miss India USA’) मध्ये वॉशिंग्टनची प्रतिनिधी म्हणून उतरणार आहे.

 

 

Web Title :- Aditi Patange Pune | pune based aditi patange won miss india washington crown

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 214 नवीन रुग्ण रुग्ण, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 172 रुग्ण

 

तुम्ही सुद्धा जास्त Paracetamol घेत आहात का?, वयाच्या हिशेबाने ‘हा’ आहे क्रोसीन,काल्पोल, डोलोचा योग्य डोस

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 43,697 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी