Aditya Thackeray | ‘महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका’ आदित्य ठाकरेंचा कर्नाटकाला इशारा; मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र-कर्नाटक वाद शांत होण्याची लक्षणे दिसत नाहीत. कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले. त्यानंतर आज (८ डिसेंबर) पुन्हा कर्नाटकातील गदगमध्ये महाराष्ट्र नोंदणीच्या ट्रकवर काळे फासण्याचा प्रकार घडला आहे. सदर प्रकार समोर येताच युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) दिला आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली आहे.

 

“महाराष्ट्राने संयम पाळला असून, त्यांच्यासारखा धुडगूस घातलेला नाही. पण, आता आमच्या संयमाचा अंत पाहू नका. महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगावात जाऊन काय, कोणाशी आणि कशावर चर्चा करणार होते? तो प्रांत महाराष्ट्राचा आहे, त्यावर चर्चा होऊ शकते का? आपले मंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यावर घाबरले. सरकार जर घाबरट असेल तर राज्याला पुढे कसं नेणार. त्यामुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मधला मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. लढाई न्यायालयात सुरू असताना, कर्नाटकाकडून जे काही चाललंय, ते असलेलं योग्य नाही.” आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

ठाकरे म्हणाले, “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी खरा मुख्यमंत्री कोण आहे, हे सांगितलं.
तरीसुद्धा त्यांच्यांकडून सीमाप्रश्नावर एक शब्दही येत नाही. त्यामुळे त्यांना शिवसेना नाव लावण्याचा अधिकार नाही.
जे घाबरट आहे, ते स्वत:ला शिवसेना म्हणू शकत नाही. घाबरट सरकार जनतेला पुढे नेऊ नाही शकत,”
असे टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सोडलं आहे.
तसेच, “गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवण्यात आले.
तसेच, आता कर्नाटक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील गावे पळवण्याचं काम सुरू आहे का?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Aditya Thackeray | aaditya thackeray attacks eknath shinde over karnataka maharashtra border row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…