Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंनी राजकीय गुन्हेगारीचा वाचला पाढा, उल्हासनगर गोळीबार प्रकरणावर म्हणाले, ”बेकायदेशीर मुख्यमंत्र्यामुळे…”

मुंबई : Aditya Thackeray | कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Shinde Group Mahesh Gaikwad) आणि त्यांच्या साथीदारांवर उल्हासनगरच्या हिल पोलीस ठाण्यात (Hill Police Station) काल रात्री गोळीबार (Ulhasnagar Firing Case) केला. या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी महायुतीला चौफेर घेरले आहे. शिवसेना (Shivsena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करताना सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या गुन्हेगारीचा पाढाच वाचून दाखवला.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपा पुरस्कृत खोके सरकारने महाराष्ट्र हाती घेतल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही उदाहरणे दिसून येतात.

१) एक भाजपा आमदार पोलीस ठाण्यात मिंदे टोळीच्या नेत्यावर ५ गोळ्या झाडतो.
२) गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत मिंदे टोळीच्या आमदाराने हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. त्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांच्या बंदुकीतून गोळी झाड़ली. याचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. या कृत्याचे बक्षिस म्हणून आता त्यांना एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवलं आहे.
३) मिंदे टोळीच्या आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. त्यानंतर मुलगा होर्डिंगवर दिसतो परंतु पोलीस कारवाई नाही.
४) मिंदे टोळीच्या आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईतील भाजपा कार्यकत्र्यांना मारहाण केली. त्याठिकाणी २०२२ पर्यंत विरोधी पक्ष असलेले भाजपा नेते पोहचले परंतु तिथेही पोलीस कारवाई झाली नाही.
५) मिंदे टोळीचा नेता त्याच्या मुलासह एका कुटुंबाला आणि मुलीला घरात घुसून मारहाण करतानाचे कॅमेऱ्यात कैद झाले
परंतु तिथेही कारवाई नाही.
६) ठाण्यातही या टोळीच्या स्थानिक नेत्यांनी खतऋ उपचार घेणाऱ्या महिलेला पोटात लाथ मारत मारहाण केली.
ही घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली परंतु पोलीस कारवाई झाली नाही.

गेल्या २ वर्षात बनावट आणि खोट्या व्हॉट्सअप मेसेजमुळे अनेक ठिकाणी दंगली उसळल्या.
गुंड व्यावसायिकांना धमकावत आहेत. दुर्दैवाने अत्यंत असक्षम आणि बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांमुळे ही महाराष्ट्राची
सद्यस्थिती आहे. या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल? अशी चिंता आदित्य यांनी व्यक्त केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोक्का गुन्ह्यातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

मासे विकत घेण्यावरुन वाद, तरुणावर कोयत्याने वार; दहशत पसरवणाऱ्या तिघांना अटक, भोसरी परिसरातील प्रकार

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : एकत्रित तपासासाठी विठ्ठल शेलारसह 7 आरोपींना पोलीस कोठडी

तळेगाव दाभाडे : जुन्या वादातून हातोड्याने डोक्यात वार, जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल

पतसंस्थेने सील केलेल्या सदनिकेवर अतिक्रमण, डॉक्टरवर FIR; कोंढवा परिसरातील प्रकार

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर एकेरी भाषेत टीका, ”तू ओबीसींचं वाटोळं केलं…”