Pune Pimpri Chinchwad Crime News | मासे विकत घेण्यावरुन वाद, तरुणावर कोयत्याने वार; दहशत पसरवणाऱ्या तिघांना अटक, भोसरी परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मासे घेण्यावरुन झालेल्या वादातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार गुरुवार (दि.1) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील मच्छी मार्केट येथे घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत आब्बास इकबाल आत्तार (वय-27 रा. बालाजीनगर, टेल्को रोड, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून आदर्श उर्फ कुक्या गोविंद जगताप (रा. आदर्शनगर, मोशी), सुनील राणोजी जावळे (रा. आदर्शनगर, मोशी), रोहित उर्फ कुख्या ज्ञानेश्वर सोनवणे (रा. आळंदी रोड, भोसरी) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्य़ादी यांच्या वडिलांना अर्वाच्च भाषेत बोलून तु आम्ही सांगेन तेथुनच मासे घे, नाहीतर तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली. फिर्यादीच्या वडिलांनी याबाबत जाब विचारला असता आरोपींनी चिडून मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी तु आम्हाला ओळखले नाही तुला तर दाखवतोच असे म्हणत आदर्श जगताप याने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने फिर्यादीवर वार केला. त्यावेळी वार चुकवला.

आरोपीने फिर्य़ादीच्या हाताच्या पंजावर व मनगटावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरु असताना त्याठिकाणी लोक जमा झाले. त्यावेळी आरोपी जगताप याने हातातील कोयता लोकांना दाखवला तर इतर दोघांनी जर कोणी भांडणे सोडवण्यासाठी आला तर त्याला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत दहशत माजवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ulhasnagar Firing Case | PM मोदी आणि फडणवीसांकडे गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराची मागणी, ”एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या…”

NCP MP Supriya Sule | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, ”राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ…” (Video)

Ajit Pawar | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

Helmet Compliance In Pune | कोण म्हणतेय पुणे शहरात हेल्मेट सक्ती नाही ! गतवर्षभरात हेल्मेट परिधान न करणार्‍या 4 लाख दुचाकीस्वारांना दंड

वाद मिटवणे पडले महागात, तरुणाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण; पेरणे फाटा येथील प्रकार

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण