Pune Pimpri Chinchwad Crime News | पतसंस्थेने सील केलेल्या सदनिकेवर अतिक्रमण, डॉक्टरवर FIR; कोंढवा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हप्ते थकल्याने पतसंस्थेने सील केलेल्या सदनिकेत दोघांनी अतिक्रमण केले. याप्रकरणी डॉक्टर सह त्याच्या पत्नी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 मार्च 2022 ते 8 जून 2023 या कालावधीत कोंढवा बुद्रुक येथील गोकुळनगर येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पतसंस्थेचे विशेष वसुली व विक्री अधिकारी सागर भगवान वेदपाठक (वय-38 रा. भगवती नगर, सुसगाव) यांनी कोंढवा पोलस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून डॉ. मनोज उद्धव निचल (वय-55), सुषमा मनोज निचल (वय 50 दोघे रा. गोकुळनगर, कोंढवा व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 441, 447 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी सागर वेदपाठक हे श्रीराम नागरी पतसंस्थेत विशेष वसुली व विक्री अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. आरोपींनी त्यांची मिळकत पतसंस्थेकडे गहाण ठेवून 15 लाख रुपये कर्ज घेतले आहे. मात्र, आरोपींनी कर्जाचा एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी पतसंस्थेने दावा दाखल केला होता. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय पुणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी वेळोवेळी आदेश दिले होते. त्यामुळे पतसंस्थेने आरोपींची मिळकत ताब्यात घेऊन सिल व लॉक केली होती. असे असताना आरोपींनी मिळकतीचे सील व लॉक तोडून मिळकतीमध्ये अतिक्रमण करुन शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ulhasnagar Firing Case | PM मोदी आणि फडणवीसांकडे गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराची मागणी, ”एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या…”

NCP MP Supriya Sule | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, ”राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ…” (Video)

Ajit Pawar | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

Helmet Compliance In Pune | कोण म्हणतेय पुणे शहरात हेल्मेट सक्ती नाही ! गतवर्षभरात हेल्मेट परिधान न करणार्‍या 4 लाख दुचाकीस्वारांना दंड

वाद मिटवणे पडले महागात, तरुणाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण; पेरणे फाटा येथील प्रकार

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण