Pune Pimpri Chinchwad Crime News | तळेगाव दाभाडे : जुन्या वादातून हातोड्याने डोक्यात वार, जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकावर हातोड्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले होते. जखमीवर मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात 302 गुन्ह्याचे कलम वाढ करण्यात आले आहे. ही घटना 2 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास जिजामाता चौकातील खळदे आळी येथे घडला होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

या घटनेत फिरोज बहाणू यांचा उपचारा दरम्यान मंगळवारी (दि.30) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दुर्गेश भगेलू चौरसिया (रा. थुमवर ता. डुमरियागंज जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) याच्यावर आयपीसी 326, 324, 504, 506 गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 302 चे कलम वाढ करण्यात आले आहे. याबाबत प्रमोद जयचंद चव्हाण (वय-27 रा. खळदे आळी, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्याचे मित्र फिरोज बहाणु व दुर्गेश चौरसिया असे तिघे दारु पित बसले होते. त्यावेळी आरोपी दुर्गेश चौरसिया याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिरोज व फिर्य़ादी यांच्यासोबत वाद घातला. आरोपीने फोरोजच्या डोक्यात हातोड्याने मारुन गंभीर जखमी केले होते. तसेच फिर्य़ादी यांना देखील मारहाण केली होती. गंभीर जखमी झाल्याने फिरोज बहाणु याला मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना फिरोज याचा 30 जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढ करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ulhasnagar Firing Case | PM मोदी आणि फडणवीसांकडे गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाराची मागणी, ”एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या…”

NCP MP Supriya Sule | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, ”राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ…” (Video)

Ajit Pawar | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणावर अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

Helmet Compliance In Pune | कोण म्हणतेय पुणे शहरात हेल्मेट सक्ती नाही ! गतवर्षभरात हेल्मेट परिधान न करणार्‍या 4 लाख दुचाकीस्वारांना दंड

वाद मिटवणे पडले महागात, तरुणाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण; पेरणे फाटा येथील प्रकार

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण