पूरग्रस्त व्यापाऱ्यांसाठी आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना ‘साकडे’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – महापुराचे थैमान ओसरल्यानंतर सांगली – कोल्हापूरच्या पुरग्रस्तांची चौकशी करण्यासाठी आलेल्या शिवसेना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यापाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. एक वर्षासाठी जीएसटी व विविध करातून सूट द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

कृष्णा नदीच्या महापुराने सांगली शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. सांगलीच्या बाजारपेठेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बाजारपेठेला शिवसेनेचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत, त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना एका वर्षासाठी जीएसटी आणि विविध करांमध्ये सूट देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ती मागणी लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती शिवसेना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच, सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीच्या अंमलबजावणीसाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू असे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे.

You might also like