डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकिल संजीव पुनाळेकर यांना जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यप्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाकडून पुनाळेकर यांचा जामीन मंजुर करण्यात आला आहे. तिस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना न्यायालयाने जामीन दिला असून काही अटी देखील घातल्या आहेत.


न्यायालयाने पुनाळेकर यांचा जामीन मंजूर करताना सीबीआय ऑफिसला सोमवार आणि गुरुवारी हजर राहणे, परवानगीशिवाय परदेशात न जाणे, साक्षीदारांवर दबाव आणू नये, सीबीआयने बोलावल्यास हजर रहावे अशा अटी घातल्या आहेत. आरोपी शरद कळकरला पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप पुनाळेकर यांच्यावर आहे.

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप त्यांच्यावर आहेत. अटकेत असलेल्या शरद कळसरकरने चौकशी दरम्यान संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी दाभोलकरांना मारलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुनाळेकर आणि भावे याला अटक करण्यात आली होती.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत