प्रेमविवाह केल्यानंतर पतीला लागलं ‘ते’ व्यसन, पत्नीनं पाहिलं अन् केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   प्रेमविवाह झाल्यानंतर पतीला दारुचं व्यसन लागल्याने आणि पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उंडरी येथे घडली आहे. आरोपी पतीने घरामध्ये घरभाडं, विजबील आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लपवून ठेवलेल्या पैशाची दारुवर उधळपट्टी केली. यांमुळे संतापलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलत स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. पतीने लपवून ठेवलेले पैसे दारुवर खर्च केल्याने घर भाडं कठून देयचं या काळजीतून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी पतीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकिता कुंदन कांबळे (वय-25 रा. उंडरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. कुंदन कांबळे (वय-29) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कुंदन हा आपल्या पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासोबत उंडरी येथे रहात होता. शनिवारी रात्री उशीरा अंकिताने पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंकिताचे वडील व्यंकट जाधव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुंदन आणि अंकिता यांनी 2017 मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर सुरुवातीला काही दिवस सुखात गेल्यानंतर कुंदनला दारु पिण्याचे व्यसन लागले. कालांतराने कुदने दररोज दारु पिण्यास सुरुवात केली. यावरुन कुंदन आणि अंकिता यांच्यामध्ये खटके उडत होते. मात्र याचा कुंदनवर काहीही परिणाम झाला नाही. त्याने दारु पिऊन पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. कुंदला दारुचे व्यसन लागल्याने घरातील सर्व जबाबदारी अंकिताच्या खांद्यावर येऊन पडली. घरभाडे, विजबील आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पाशांची गरज भासू लगली. त्यामुळे अंकिताने पैसे लपवून ठेवले होते.

आरोपी कुंदन याला पत्नीने पैसे लपवून ठेवले होते हे समजले होते. त्यामुळे त्याचा या पैशांवर डोळा असायचा. आरोपीने शनिवारी पत्नीने लपवून ठेवलेले सर्व पैसे चोरले आणि ते पैसे दारुवर उडवले. घरभाड आणि विज बिलासाठी ठवलेले पैसे कुंदनने दारुवर उडवल्याचे समजताच अंकिताचा संताप अनावर झाला. त्यातच तिने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने अंकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.