अरबाज खान नंतर दिग्दर्शक साजिद खानही आएपीएल बेटिंगच्या जाळ्यात ?

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन

आयपीएल मध्ये सट्टा लावण्याप्रकरणी नुकतीच बाॅलिवुड अभिनेता अरबाज खान याने कबुली दिली आहे. याबरोबर बाॅलिवुडचे दुसरे महत्त्वाचे नाव दिग्दर्शक,अभिनेता साजिद खान यांचे बेटिंग प्रकरणात समोर येताना दिसत आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेला बुकी सोनु जालान याने दिलेल्या माहितीनुसार सात वर्षापुर्वी साजित खानने क्रिकेटवर बेटिंग केल्याची माहिती मिळते. ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून ही चाैकशी करण्यात आली, दरम्यान हा खुलासा समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात सजित खानला लवकरच चाैकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

सोनू जालानला ज्या होंडा सिटी गाडीतून अटक करण्यात आली होती, तिचा मालक असलेल्या समीर बुद्धा याची आज ठाणे खंडणीविरोधी पथकानं तीन तास कसून चौकशी केली. यावेळी आपला आयपीएल बेटिंगशी काहीही संबंध नसल्याचा दावा समीरने केला. समीर याचा भाऊ सोहेल बुद्धा मुंबई पोलिसात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून तो सोनू जालान याचा मास्टरमाईंड मानला जातो. त्याच्याच माध्यमातून सोनूची समीरशी ओळख झाली आणि त्यांनी २०१५ साली ऑटो स्पेअरपार्ट्सची फॅक्टरी सुरु केली. यावेळी सोनू आणि समीरने एक होंडा सिटी गाडीही विकत घेतली होती.पुढे व्यवसाय बंद पडल्यावर ही गाडी सोनूने घेतली. मात्र ती अजूनही समीर बुद्धा याच्याच नावावर असून याच गाडीतून सोनू जालानला अटक करण्यात आल्यानं पोलिसांनी समीर याची चौकशी केली. तर उद्या या प्रकरणात चित्रपट निर्माता पराग संघवी याची ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून चौकशी केली जाणार आहे.