जळगाव : शेतात विष पिऊन युवकाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भोलाणे येथील एक युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोकुळ सुकदेव सपकाळे (वय,२२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली. तर गुरुवारी पहाटे दोन वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. अद्याप आत्महत्याचे कारण अजून अस्पष्ट आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गोकुळ हा आई वडीलांसोबत भोलाणे गावात राहत होता. भोलाणे येथे त्यांचे शेत असून बुधवारी दुपारी १.३० वाजता शेतात काम करतेवेळी शेतासाठी लागत असणारे विषारी औषध गोकुळने घेतले. विषारी औषध घेतल्यानंतर तसाच तो गावात आला. त्याचा चुलतभाऊ जगदीश याला त्याने आपण विषारी औषध घेतल्याचे सांगितले. नंतर त्याला लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र मध्यरात्री दोनच्या दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.