काय सांगता ! होय, जुळ्या बाळांना जन्म दिल्यावर महिला म्हणाली मला माहित नव्हते मी गर्भवती होते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ऑस्ट्रेलियातील एका महिलेने जे सांगितले ते ऐकून तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे. जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर महिला म्हणाली की, मी गर्भवती असल्याचे मला माहितीच नव्हते. 6 महिन्यांनंतर तिला पोटात काहीतरी गडबड सुरु असल्याचे जाणवले. त्यानंतर ती डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली असता डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. ती 6 महिन्यांची गर्भवती होती. मॅकक्रेमध्ये राहणारी एनीने टूपोने फेसबुकवर महिलांसंबंधी एका ग्रुपमध्ये आपला अनुभव शेअर केला.

एनीने म्हटले आहे की, मेडिकल चेकअपसाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. हे तिच्यासाठी एक धक्काच होता. कारण तिच्या शरीरात कोणताही विशेष बदल झाला नव्हता. तिचा पती रसेल याला देखील प्रश्न पडला होता. एनी म्हणाली की, मला कधीच चक्कर आली नाही. फक्त कधीतरी थकल्यासारखे जाणवत होते. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी गर्भवती असून पोटात जुळे बाळ असल्याचे मला काही दिवसापूर्वीच समजले होते. एनी 25 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता वॉशरूमला गेली होती. पण तिला लगेच जाणीव झाली की, तिला त्रास होत आहे. ती म्हणाली की, मी खाली पाहिले माझ्या मुलीचे अर्ध डोके बाहेर आले होेते. त्यावेळी काय करावे मला काही सुचत नव्हते. माझा पती घरी नव्हता. मी टॉवेल आणि चादर घेतली. त्यानंतर तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. थोड्यावेळाने मेड्स पोहोचली तिने आई आणि बाळांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.