जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये होतायेत सामील, गृहमंत्रालयाची चिंता

पोलिसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणार्‍या स्थानिक तरूणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा गृहमंत्रालयासाठी चिंतेचा विषय बनला आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले.

स्थानिक तरुण विविध दहशतवादी संघटनांमध्ये सामिल झाल्याचे गृहमंत्रालयाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 45 हिजबुल मुजाहिद्दीन, 20 लष्कर-ए-तोयबा. 14 जैश-ए-मोहम्मद, 7 अल बद्र, दोन अंसार गजवत उल हिंद आणि एक आयएसजेकेमध्ये सामिल झाले आहेत. ही संख्या अधिकही असू शकते याबाबत मोठी चिंता आहे. यापूर्वी सुरक्षा दलांना कुटुंब किंवा शेजारी राहत असलेल्यांसह सोशल मीडिया पोस्टद्वारेही तरूण बेपत्ता झाला असून दहशतावादी संघटनेत सामिल झाले होते. दरम्यान, दहशतवाद्यांबरोबर होत असलेल्या चकमकीनंतर त्यांची माहिती समोर आली आहे. त्यापैकी बहुतांश स्थानिक तरूण असल्याचे चकमकींमध्ये ठार झालेल्यांवरुन दिसून आले आहे . 90 टक्के दहशतवादी हे काश्मीरमधील स्थानिकच होते. यावर्षी पहिल्या सात महिन्यांमध्ये काश्मीर खोर्‍यात ठार करण्यात आलेल्या 136 दहशतवाद्यांपैकी 121 स्थानिक होते आणि केवळ 15 दहशतवाही हे बाहेरील होते. तर 2019 मध्ये ठार करण्यात आलेल्या 152 पैकी 119 स्थानिक होते. कितीही दहशतवाद्यांना ठार केले. तरी त्यांची संख्या कमी होत नाही, असे एका नॉर्थ ब्लॉकच्या अधिकार्‍याने सांगितले आहे.