‘त्या’ हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची खा. हिना गावित यांची मागणी 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे, नंदुरबार येथील डीपीडीसीच्या बैठकीदरम्यान खासदार हिना गावित यांच्या गाडीवर  चढून तोडफोड करण्याचा प्रकार केला गेला. या घटनेनंतर हिना गावित यांनी तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकसभेत केली  आहे. यावेळी बोलताना हिना गावित म्हणाल्या  “मी आदिवासी महिला खासदार असल्यानेच जाणीवपूर्वक मला लक्ष केले जात आहे असा आरोप गावित यांनी केला.”
याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की , डीपीसीच्या मीटिंगला काल इतरही लोकप्रतिनिधी होते. केवळ मला लक्ष्य करण्यात आले आहे.  दहा ते पंधरा जणांनी माझ्या गाडीवरती हा हल्ला केला, गाडी पलटवण्याचा प्रयत्न केला. मी गाडीतून उतरले नसते, तर माझा मृत्यूही झाला असता, असे  हिना गावित यांनी सभागृहात सांगितले .त्याठिकाणी केवळ चार कॉन्स्टेबल उपस्थित होते. त्यांनी हल्लीखोरांना रोखण्याचे काम केले नाही . ते केवळ बघत राहिले. असा आरोप खासदार गावित यांनी केला.
[amazon_link asins=’B00YGLFY9Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc159e40-9962-11e8-bfe1-514707e9a9f6′]
तोडफोड करणाऱ्या पंधरा जणांवर एफआयआर दाखल केली पण त्यांना दोन तासाच्या आताच सोडून दिले . एव्हढेच नाही तर ज्या व्यक्तीने हा हल्ला केला त्याचा हार तुरे घालून सत्कार करण्यात आला . एवढे कोणते मोठे काम त्यांनी केले असा सवाल गावित यांनी लोकसभेत उपस्थित केला .
[amazon_link asins=’B071DDG7GJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7c5e1f2-9962-11e8-a7c5-5d6032b3fde8′]
याबरोबरच त्या म्हणाल्या , “मी आदिवासी महिला खासदार आहे, माझे  रक्षण पोलीस करु शकत नसतील, तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? या संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना तातडीने निलंबित करावे “अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली.
दरम्यान , मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/